22 C
Mumbai
Tuesday, January 31, 2023
घरअर्थजगतराज्यात हिंदुजा समूह करणार ३५ हजार कोटींची गुंतवणूक

राज्यात हिंदुजा समूह करणार ३५ हजार कोटींची गुंतवणूक

सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

Google News Follow

Related

महाराष्ट्रात उद्योगांनी गुंतवणुकीसाठी पुढे यावे या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आवाहनाला जगभरातील विविध उद्योजकांसह उद्योग समूहांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आज, हिंदुजा समूहाने महाराष्ट्रात विविध ११ क्षेत्रांमध्ये सुमारे ३५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा राज्य सरकारशी सामंजस्य करार केला आहे.

दोन दिवसांपूर्वी शासनाने ७० हजार कोटींच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावांना मंत्रिमंडळ उपसमितीने मान्यता दिली असून त्यातून ५५ हजारांपेक्षा अधिक तरुणांना रोजगार मिळणार आहे. सरकारी विभागांमध्ये ७५ हजार नोकऱ्या आम्ही उपलब्ध करुन देत आहोत, मात्र खाजगी क्षेत्रातही आता या गुंतवणुकीमुळे नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

हे ही वाचा : 

संजय राऊत म्हणातात, आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात झाला

हत्या झालेली वीणा कपूर आणि जिवंत वीणा कपूर यामुळे उडाला गोंधळ

नेमाडपंथी पुरोगामी अज्ञानपीठ

समृद्धी महामार्गावर नागपूर-शिर्डी, नागपूर-औरंगाबाद एसटी सेवा सुरू

देशात सर्वाधिक स्टार्टअप्स महाराष्ट्रात असून उद्योगांच्या परवान्यांसाठी एक खिडकी योजना सुरु केली आहे.उद्योजकांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकार आणि प्रशासन कटिबद्ध आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. हिंदुजा समूह राज्यात नवीकरणीय ऊर्जा, माध्यमे आणि मनोरंजन, ग्रामीण आर्थिक विकास, सायबर सुरक्षा, व्यावसायिक ऑटोमोबाईल्स, बॅंकिंग- फायनान्स, आरोग्य, पायाभूत सुविधा, शिक्षण, उत्पादन आणि नव तंत्रज्ञान या ११ क्षेत्रात गुंतवणूक करणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,916चाहतेआवड दर्शवा
2,004अनुयायीअनुकरण करा
61,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा