कांदिवली पूर्व येथे सुसज्ज नाट्यगृह हवे यासाठी आमदार अतुल भातखळकर यांनी बराच काळ पाठपुरावा केला आहे. यासंदर्भात त्यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेतली. नाट्यगृहाच्या उभारणीबाबत तसेच विविध नागरी सुविधांबाबत त्यांच्याशी चर्चा झाली.
आमदार भातखळकर यांनी एकावर पोस्ट करत म्हटले आहे की, कांदिवली पूर्व मध्ये सुसज्ज नाट्यगृह हवे, या मागणीसाठी मी बराच काळ पाठपुरवा करत होतो. एक भूखंड मी आरक्षित करून घेतला होता, परंतु तो पुरेसा नाही. अधिक प्रशस्त भूखंडाची आवश्यकता आहे.
हे ही वाचा:
NEET घोटाळा: १० लाखांचा पेपर १५ लाखांना विकला, सीबीआयने केली अटक
जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरची आत्महत्या
“शिवाजीही आमचे आणि औरंगजेबही आमचे”
सांगलीत मंदिराची भिंत कोसळून सहाजणांचा मृत्यू
मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांच्यासोबत आज झालेल्या भेटीदरम्यान नाट्यगृहाच्या भूखंडाबाबत सकारात्मक चर्चा झाली. मला असे वाटते की नाट्यगृहाचा मार्ग बऱ्यापैकी मोकळा झालाय.
रस्ते, पाणीपुरवठा, जलनिस्सारण व्यवस्था, पार्किंग, वाहतूक कोंडी, स्वच्छता, उद्याने, सार्वजनिक सुविधा या विषयांवरही अत्यंत समाधानकारक चर्चा झाली.







