33 C
Mumbai
Saturday, November 27, 2021
घरराजकारण'बोगस शेतकऱ्यांना मिठ्या मारणारे एसटी कर्मचाऱ्यांना दम भरतायत'

‘बोगस शेतकऱ्यांना मिठ्या मारणारे एसटी कर्मचाऱ्यांना दम भरतायत’

Related

२४ तासांत कामावर हजर राहिला नाहीत तर सेवा समाप्त केली जाईल, असा इशारा एसटी महामंडळाने दिलेला असताना त्यावर भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी टोला लगावला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, २४ तासात कामावर हजर व्हा नाही तर सेवा समाप्ती करण्यात येईल, असा अंतिम पर्याय एसटी महामंडळाने दिला आहे. उत्तरेतील बोगस शेतकरी नेत्यांना मिठ्या मारून पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेचे नेते इथे मात्र संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना दम भरतायत.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनच्या सुरुवातीच्या दिवसांत आंदोलनातल्या तथाकथित शेतकऱ्यांच्या नेत्यांना मिठी मारून त्यांना पाठिंबा देत होते. त्याचा संदर्भ घेत आमदार भातखळकर यांनी ही टीका केली आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा देणारे शिवसेनेच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार आता मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आता एसटी महामंडळ कठोर निर्णय घेत असून महामंडळाने कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या ३०० ते ३५० कामगारांना एसटी महामंडळाने सेवा समाप्तीची कारणे दाखवा अशी नोटीस बजावली आहे. या कामगारांनी २४ तासांत कामावर हजर व्हावे, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल, असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

एसटी महामंडळात रोजंदारी स्वरूपातील म्हणजेच दिवस भरला तर पगार, अशा तात्पुरत्या स्वरूपाच्या नेमणूकीचे सुमारे २ हजार कर्मचारी आहेत. त्यांना महामंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

 

हे ही वाचा:

मेहबूबा मुफ्तींच्या भावाला ईडीचे समन्स

तळपत्या ‘सूर्या’ च्या किवींना झळा

मुंबईत हिवसाळा; दक्षिण मुंबईत पावसाने लावली जोरदार हजेरी

‘एसटी कर्मचाऱ्यांनो, तुम्ही एक ऐतिहासिक लढा लढत आहात’

 

एसटी महामंडळाने आतापर्यंत २ हजार २९६ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. दरम्यान, मंगळवारी एसटी महामंडळाचे सुमारे साडेसात हजार कर्मचारी कामावर हजर झाले. मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, आशिष शेलार अशा अनेक नेत्यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,506अनुयायीअनुकरण करा
4,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा