निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणुकीच्या तारखांची घोषणा होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या एक्स अकाऊंटवरून त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
लोकशाहीचा सर्वात मोठा सण आला असून निवडणूक आयोगाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. भाजपा-एनडीए निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहोत, असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. दहा वर्षांपूर्वी सत्ता हाती घेण्यापूर्वी इंडिया आघाडीच्या दयनीय कारभारामुळे भारतातील जनता निराश वाटत होती. जगाने भारताची साथ सोडून दिली होती. यातून भारताला बाहेर काढले. १४० कोटी भारतीयांच्या शक्तीमुळे आपला देश विकासाचे नवनवीन विक्रम करत आहे. जगातील ५ वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आपण झालो आहोत, करोडो लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. आमच्या योजना भारताच्या सर्व भागात पोहोचल्या आहेत आणि त्यांचे चांगले परिणाम दिसून आले आहेत, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
हे ही वाचा..
राजकारण, ईव्हीएम आणि मुख्य निवडणूक आयुक्तांची शेरो शायरी
महाराष्ट्रात पाच टप्प्यात होणार मतदान
राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार
गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपा प्रवेश
एक मजबूत केंद्र सरकार काय करू शकते हे लोक पाहत आहेत. भारताच्या कानाकोपऱ्यातून एकचं आवाज येत आहे की, “अब की बार, ४०० पार!” तिसऱ्या कार्यकाळात बरीच कामे करायची आहेत. सत्तर वर्षे राज्य करणाऱ्यांनी निर्माण केलेलr पोकळी भरून काढण्याचं मागचं दशक होतं. भारत समृद्ध आणि स्वावलंबी होऊ शकतो या भावनेला पुढे न्यायचे आहे. गरिबी आणि भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई लढायची आहे. भारताला तिसरी सर्वात मोठी जागतिक अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेने काम करणार आहोत. जेव्हा देशवासी म्हणतात, ‘मैं हूँ मोदी का परिवार’, तेव्हा विकसित भारताच्या उभारणीसाठी कठोर परिश्रम करण्यास प्रोत्साहित करतात, अशा भावना नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.