29 C
Mumbai
Wednesday, May 18, 2022
घरराजकारणआगामी निवडणुकांमध्ये भाजपा देणार २७% ओबीसींना प्रतिनिधित्व

आगामी निवडणुकांमध्ये भाजपा देणार २७% ओबीसींना प्रतिनिधित्व

Related

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले असले तरीदेखील आगामी निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी २७% जागा या ओबीसी समाजातीलच प्रतिनिधींना देणार अशी घोषणा फडणवीस यांनी केली आहे. मुंबई येथे आयोजित महाराष्ट्र भाजपा ओबीसी मोर्चाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे.

काय म्हणाले फडणवीस?
ओबीसी आरक्षणावर गदा आणण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. पण आम्ही सजग होतो. विविध उपाययोजना केल्याने अनेक ठिकाणी ओबीसींना अधिकचे प्रतिनिधित्व देण्याचे काम आम्ही आमच्या काळात केले. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यावर पहिल्यांदा ट्रिपल टेस्टचा मुद्दा आला. पण या सरकारने केवळ वेळकाढू धोरण अवलंबिले. वारंवार न्यायालयात तारखा मागण्याचे काम केले. सर्वपक्षीय बैठकीत मान्य करायचे आणि नंतर काहीच करायचे नाही, हेच त्यांचे धोरण राहिले.

हे ही वाचा:

विलेपार्लेतील एलआयसी कार्यालयाला आग

राम मंदिराच्या उभारणीसाठी मुस्लीम डॉक्टरांनी दान केली एवढी मालमत्ता

महिला IAS अधिकाऱ्याच्या घरी ईडीला सापडलं मोठं घबाड

‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये तीन मराठी सिनेमांची वर्णी

सर्वोच्च न्यायालयाने एम्पिरिकल डेटा द्यायला सांगितले तरी जनगणनेचा डेटा की एम्पिरिकल डेटा यातच महाविकास आघाडी सरकारने घोळ घातला. राज्य मागासवर्ग आयोगाने एका महिन्यात अहवाल तयार करण्याची तयारी दर्शविली, पण राज्य सरकारने त्यांना सुविधाच दिल्या नाहीत. अखेर राज्य मागासवर्ग आयोगाला शेवटी स्वतंत्र प्रसिद्धी पत्रक काढून खुलासा करावा लागला. या सरकारने केवळ आणि केवळ ओबीसींचा विश्वासघात केला आहे.

या महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांच्या मालकांना ओबीसी आरक्षण नको आहे. त्यामुळे आता निर्वाणीच्या संघर्षाची वेळ आली आहे. जोवर ओबीसी आरक्षण मिळत नाही, तोवर आमचा हा संघर्ष सुरूच राहील असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला आहे. यांच्यासमोर कोणतीही समस्या आली, की केंद्र सरकारकडे बोट दाखवितात. सारेच जर केंद्राने करायचे तर सरकार चालवायला सुद्धा केंद्रालाच सांगा. तुम्ही काय फक्त वसुलीसाठी सरकार बनविले का? ओबीसी आरक्षण पुन्हा परत मिळत नाही, तोवर भाजपचा संघर्ष थांबणार नाही. आगामी काळात ज्या कोणत्या निवडणुका होतील, त्यात २७ टक्के उमेदवारी ही ओबीसींना देण्याचा आमचा निर्धार पक्का आहे. तशी घोषणा आम्ही पूर्वीच केली आहे असे फडणवीस म्हणाले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,978चाहतेआवड दर्शवा
1,883अनुयायीअनुकरण करा
9,330सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा