27 C
Mumbai
Tuesday, August 9, 2022
घरराजकारणसेटलवाड अटकेविरोधातील आंदोलनात कॅथलिक समाजाला ओढले जात आहे!

सेटलवाड अटकेविरोधातील आंदोलनात कॅथलिक समाजाला ओढले जात आहे!

Related

खासदार गोपाळ शेट्टी यांना उत्तर मुंबई अल्पसंख्यांक मोर्चाचे जेम्स सुसाई यांनी लिहिले पत्र

सामाजिक कार्यकर्ता तिस्ता सेटलवाड यांच्या अटकेच्या निषेधार्थ मुंबईत दादर रेल्वे स्थानकाबाहेर मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर भाजपा उत्तर मुंबई अल्पसंख्यांक मोर्चाचे उपाध्यक्ष जेम्स सुसाई यांनी भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांना पत्र लिहून या मोर्चात कॅथलिक समाजाला जाणीवपूर्वक ओढले जात असल्याची तक्रार केली आहे.

या निषेध आंदोलनात स्वतंत्र विद्यार्थी संघटना आणि डाव्या विचारसरणीच्या सदस्यांचा समावेश होता. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया-मार्क्सिस्ट (CPIM) आणि डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI), सारखे राजकीय पक्ष तसेच मुंबई स्थित नागरी संघटना जसे हम भारत के लोग (HBKL), प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशन (PWA) आणि बॉम्बे कॅथलिक सभा (BCS) या संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. यावेळी अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध करणारे पोस्टरही हातात घेतले आणि घोषणाबाजी केली.

बॉम्बे कॅथलिक सभेच्या या प्रकरणातील सहभागाबद्दल सुसाई यांनी पत्र लिहीले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “मी स्वतः एक ख्रिश्चन आणि एक कॅथलिक आहे, संपूर्ण कॅथलिक समुदायाला विनाकारण या प्रकरणी ओढले जात आहे. त्यांना अनावश्यकपणे अशा विषयात ओढले जात आहे ज्याचा त्यांचा काहीही संबंध नाही आणि कदाचित त्यांना याविषयीचे कोणतेही ज्ञान नाही. ९९.९% सभासद हे मुंबईतील सामान्य कामगार-वर्गातील लोक आहेत. तिस्ताला अटक झाली तर कोणाला काहीही फरक पडणार नाही.

हे ही वाचा:

तिस्ता सेटलवाड यांच्या अटकेबाबत संयुक्त राष्ट्रांच्या टीकेला भारताचे चोख उत्तर

‘फडणवीसांनी बाळासाहेबांच्या स्वप्नातला मुख्यमंत्री केला’

ही हिंदु्त्वाची लढाई आहे, आम्हाला पदे नको होती!

संभाजीनगर नामकरणावरून काँग्रेसच्या २०० मुस्लिम पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

 

तिस्ताचा ही एक फसवणूक करणारी आणि घोटाळे करणारी आहे. तिला खोटे बोलणे, गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी आणि २००२ च्या गुजरात दंगलीप्रकरणी निरपराधांना दोषी ठरवण्यासाठी न्यायालयात खोटे पुरावे सादर केल्याप्रकरणी तिला अटक केली आहे. कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असं मत सुसाई यांनी मांडलं आहे.

बॉम्बे कॅथलिक सभेचे ९९.९% लोक आणि संपूर्ण मुंबईतील ख्रिश्चन- कॅथलिक समाज केंद्र सरकारच्या कारभारावर समाधानी आहे. अनेक भाजपाशासित राज्यांमध्ये केलेल्या कामाचे त्यांनी उघडपणे समर्थन केले आहे. तसेच, बरेच ख्रिश्चन पक्षात सामील झाले आहेत. BCS मधील छोटा गट गुन्हेगाराच्या समर्थनार्थ घोषणा देऊन स्वतःचे स्वार्थ साधतो. बीसीएसचे हे नेते दिशाभूल करणारे आहेत आणि दिशाभूल करण्यामुळे समुदायाची प्रतिष्ठा खराब होते.

जर या नेत्यांना खरोखरच कॅथोलिक समुदायाला पाठिंबा द्यायचा असता तर शुल्लक गुन्ह्यांसाठी तुरुंगात असलेल्या गरीब ख्रिश्चनांसाठी आणि वकीलांची नियुक्ती करून त्यांचे खटले लढता आले असते? पण नाही त्याऐवजी ते तीस्ता सारख्या फसवणुक करणाऱ्या व्यक्तीला समर्थन देत आहेत. या बीसीएस नेत्यांवर काही कारवाई होणे गरजेचे आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. मुंबईतील कॅथलिक समुदाय आणि संपूर्ण देश हा पंतप्रधान मोदींच्या पाठीशी उभा आहे. आम्ही इतरांसारखेच राष्ट्रवादी आहोत, असेही ते म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,918चाहतेआवड दर्शवा
1,925अनुयायीअनुकरण करा
16,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा