डबल महाराष्ट्र केसरी पैलवान तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी आपल्या निर्णयाची माहिती दिली.
उद्धव यांच्या पक्षाला सोडून ते जाणार कुठे याविषयी शिवसेना एकनाथ शिंदे यांचे नाव पुढे येत होते. अखेर त्यांनी शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय चंद्रहार यांनी घेतला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी चंद्रहार पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. चंद्रहार पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती, त्यात ते पराभूत झाले होते. आता त्यांना महायुती सोबत जाण्याची इच्छा आहे. पाटील यांनी सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. एक वर्षानं चंद्रहार पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे.
आपल्या या भूमिकेबद्दल ते म्हणाले की, राज्यातील क्रीडा क्षेत्रामध्ये काम करत असताना, बऱ्याच त्रुटी, अडचणी, गैरप्रकार मी अनुभवलेले आहेत. अशा बाबींविरुद्ध मी वेळोवेळी आवाज देखील उठवला आहे. परंतु, प्रत्यक्ष शासन सहभागाशिवाय असे प्रश्न मार्गी लागणे कठीण आहे. म्हणून सरकार सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे, असं चंद्रहार पाटील म्हणाले.
हे ही वाचा:
भारताला निमंत्रण देण्यावर इतर जी-७च्या सहा देशांचा आग्रह होता!
सर्व शासकीय कार्यालयात आता सौर ऊर्जेचा वापर
“नवा युग, नवा कर्णधार, नवे स्वप्न!”
भारत-मंगोलिया सैन्यदलांचा दहशतवादविरोधी लष्करी सराव
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी ४ जून २०२५ला महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील सोमवारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगत हिंमत असेल तर थांबवा, असं आव्हान ठाकरेंच्या शिवसेनेला दिलं होतं. त्यावेळी मात्र चंद्रहार पाटील यांनी मी अजूनही ठाकरेंच्या शिवसेनेतच असून पक्ष सोडण्याबाबत अजून निर्णय घेतला नाही, असे म्हटले होते. प्रत्यक्षात आता ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून चंद्रहार पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या होत्या. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून चंद्रहार पाटील यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. खासदार श्रीकांत शिंदे यांनी एप्रिल महिन्यात चंद्रहार पाटील यांच्यासंदर्भात एक वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे चांगले कार्यकर्ते आहेत. ते जर आमच्या शिवसेनेत येणार असतील तर त्यांचे स्वागत आहे.
