कॅनडाचे पंतप्रधान आणि सध्याचे G7 अध्यक्ष मार्क कार्नी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना G7 परिषदेसाठी निमंत्रण दिल्यानंतर, आशिया पॅसिफिक फाउंडेशन ऑफ कॅनडाच्या उपाध्यक्ष वीना नजीबुल्ला यांनी म्हटले की, “इतर G7 देशांपैकी सहा देशांचा भारताला चर्चेच्या टेबलवर आणण्यासाठी जोरदार आग्रह होता.”
CBC NN ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, “कॅनडा हा एक अपवादात्मक देश आहे, कारण इतर सहा G7 सदस्य राष्ट्रे भारताशी आपली रणनीतिक भागीदारी, संरक्षण तंत्रज्ञान आणि आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यास इच्छुक आहेत. G7 संदर्भात बोलायचे झाले, तर आम्ही (कॅनडा) अपवाद आहोत कारण बाकीचे सहा देश भारताशी संबंध दृढ करत आहेत. फ्रान्स, ब्रिटन किंवा अमेरिकेने भारतासोबत आणखी काय केलं याची रोज काही ना काही घोषणा होत असते.”
हे ही वाचा:
चोरांनीच दिली ग्रामास्थांविरुद्ध तक्रार !
सर्व शासकीय कार्यालयात आता सौर ऊर्जेचा वापर
भारत-मंगोलिया सैन्यदलांचा दहशतवादविरोधी लष्करी सराव
तेलंगणात मंत्रिमंडळ विस्तार, कुणाला मिळाली संधी ?
नजीबुल्ला पुढे म्हणाल्या, “म्हणूनच भारताची उपस्थिती इतर सदस्यांसाठीही महत्त्वाची आहे. माझ्या मते, इतर G7 देशांकडून भारताला बोलावण्यासाठी खूपच दबाव होता. आणि कॅनडानेही जागतिक स्तरावर आपले स्थान सिद्ध करण्यासाठी अशा पद्धतीची राजनैतिक भूमिका घ्यावी लागते. राजनैतिक संवाद फक्त आवडणाऱ्यांशीच करायचा नसतो. ही भुरळ घालणारी भेटवस्तू नाही, तर स्वतःच्या हितसंबंधांना पुढे नेण्याचे व मूल्यांचे रक्षण करण्याचे आवश्यक साधन आहे.”
ही प्रतिक्रिया त्या वेळेला आली जेव्हा कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी PM मोदींना G7 परिषदेचे निमंत्रण पाठवले, आणि पंतप्रधान मोदींनी ते स्वीकारले. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की हरदीप सिंग निज्जरच्या हत्येनंतर भारत-कॅनडा संबंधांमध्ये आलेल्या कटुतेमुळे हे निमंत्रण देणे योग्य होते का, तेव्हा कार्नी म्हणाले: भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. तो आता जगातील सर्वात लोकसंख्येचा देश आहे. पुरवठा साखळ्यांमध्ये भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून हे पूर्णतः योग्य आहे की तो या चर्चेच्या टेबलवर असावा. याव्यतिरिक्त, भारत आणि कॅनडामध्ये आता कायदा अंमलबजावणी यंत्रणांमधील संवाद सुरु झाला आहे. उत्तरदायित्वाच्या मुद्द्यावर काही प्रगती झाली आहे. मी ह्याच संदर्भात PM मोदींना निमंत्रण दिलं आणि त्यांनी ते स्वीकारलं आहे,” असे कार्नी यांनी स्पष्ट केले.
