27.6 C
Mumbai
Tuesday, June 24, 2025
घरविशेषचोरांनीच दिली ग्रामास्थांविरुद्ध तक्रार !

चोरांनीच दिली ग्रामास्थांविरुद्ध तक्रार !

Google News Follow

Related

चोरीच्या घटना घडल्यावर पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल होणे सामान्य गोष्ट आहे, पण यावेळी रांचीमध्ये चोरांनीच गावकऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे. चोरांचे म्हणणे आहे की, “आम्ही एका घरात चोरीसाठी शिरलो होतो, पण गावकऱ्यांनी मिळून आमची जबरदस्त पिटाई केली. गावकऱ्यांच्या मारहाणीमुळे एक चोर गंभीर जखमी झाला असून, आणखी तीन जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्यांचे दोन साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले. ही घटना रांचीच्या जगन्नाथपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

चोरीच्या आरोपाखाली अटक झालेल्या पश्चिम बंगालमधील आसनसोल येथील विजय कुमारने एफआयआरमध्ये म्हटले आहे की, “तो आणि त्याचे पाच साथीदार ४-५ जूनच्या रात्री एक वाजता एका घरात चोरीसाठी शिरले होते. घरातील अलमारीतून सोन्याची साखळी आणि थोडे पैसे घेत असताना घरमालक जागा झाला. त्याने ‘चोर-चोर’ अशी आरडाओरड सुरू केली, त्यामुळे आम्ही त्याचे तोंड दाबले. तो तरीही गप्प न राहिल्यामुळे आम्ही त्याला जवळच्या विहिरीजवळ घेऊन गेलो आणि त्याला बुडवण्याचा प्रयत्न केला.”

हेही वाचा..

मोदी सरकारच्या ११ वर्षाच्या काळाची केली श्री श्री रविशंकर यांनी प्रशंसा

भारत-मंगोलिया सैन्यदलांचा दहशतवादविरोधी लष्करी सराव

राहुल गांधींच्या आरोपांना निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून उत्तर

एस. जयशंकर यांची युरोप यात्रा आजपासून

दरम्यान, गावकरीही तिथे पोहोचले आणि त्यांनी आम्हाला घेरले, असे विजय कुमारने तक्रारीत नमूद केले आहे. “गावकऱ्यांनी मला इतकी जोरदार मारहाण केली की माझा डावा हात मोडला. माझे तीन अन्य साथीदार – कमलेश चौहान, पंकज डोम आणि जान सिंह यांनाही जबर जखमा झाल्या. माडू चौहान आणि करन चौहान हे दोघे मात्र पळून गेले. विजय कुमारने गावकऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. ५ जूनच्या सकाळी सत्यारी टोळ्याचे गावकऱ्यांनी या चार चोरांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यांच्याविरोधात त्या दिवशीच अधिकृत एफआयआर दाखल करण्यात आली होती.

सूत्रांच्या माहितीनुसार, हे सर्व चोर ‘लुंगी-बनियान’ गँगचे सदस्य आहेत. ही टोळी चोरी करताना लुंगी आणि बनियान परिधान करते व शरीरावर तेल लावते, जेणेकरून पकडल्यास सुलभतेने सुटून पळून जाऊ शकतील.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
253,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा