34 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
घरराजकारणभाजपच्या नूतन कार्यकारिणीमध्ये नवीन चेहऱ्यांचा भरणा

भाजपच्या नूतन कार्यकारिणीमध्ये नवीन चेहऱ्यांचा भरणा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निमंत्रित

Google News Follow

Related

मिशन २०२४ साठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारतीय जनता पार्टीच्या नूतन प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. नवीन कार्यकारिणीमध्ये नवीन चेहऱ्यांचा भरणा करण्यात आला आहे. नूतन कार्यकारिणीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय सचिव पंकजा ताई मुंडे, विजयाताई रहाटकर यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश करण्यात आला आहे.

भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी १२ ऑगस्ट २०२२ ला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली..तेंव्हापासून त्यांनी महाराष्ट्रातील विविध भागांचे दौरे, बैठका, भेटीगाठी,यांचा धडाका लावला आहे. प्रदेशाध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर भाजपच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा अपेक्षित होती. पण त्याला वलम्ब होत होता. आता भाजपनं मिशन २०२४ डोळ्यांसमोर ठेवून नवीन कार्यकारिणीची घोषणा केली आहे.

नवीन कार्यकारिणीमध्ये भाजपाच्या उपाध्यक्षपदी माधव भांडारी, सुरेश हाळवणकर, चैनसुख संचेती, जयप्रकाश ठाकूर, ऍड. धर्मपाल मेश्राम, एजाज देशमुख, राजेंद्र गावीत आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. सरचिटणीसपदी आ. रणधीर सावरकर, ऍड. माधवी नाईक, संजय केनेकर, विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिवपदी भरत पाटील, ऍड. वर्षा डहाळे, अरुण मुंडे, महेश जाधव आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. कोषाध्यक्षपदी आ. मिहीर कोटेचा, प्रदेश मुख्यालय प्रभारीपदी रवींद्र अनासपुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विभागीय संघटनमंत्रीपदी उपेंद्र कोठेकर (विदर्भ), मकरंद देशपांडे (पश्चिम महाराष्ट्र), संजय कौडगे (मराठवाडा), शैलेश दळवी (कोकण), हेमंत म्हात्रे (ठाणे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यकारिणीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया रहाटकर, याखेरीज केंद्रीय व राज्य मंत्रिमंडळातील भाजपाचे सर्व मंत्री, राज्यमंत्री, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, राष्ट्रीय प्रवक्त्या खा. डॉ. हिना गावित, राज्यातील सर्व खासदार, आमदार आदींचा समावेश आहे. याखेरीज २८८ विधानसभा मतदारसंघांचे समन्वयक आणि ७०५ मंडलांचे प्रभारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

बावनकुळे म्हणाले, राज्यातील १ कोटी नागरिकांशी संपर्क साधून त्यांना ‘सरल ऍप द्वारे मोदी सरकारच्या लोकोपयोगी निर्णयांची माहिती दररोज देण्याची यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या संपर्क अभियानात सहभागी होत आहेत, असेही ते म्हणाले.

हे ही वाचा:

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय! आणखी ‘हे’ निर्णय घेतले

चोंबडेपणा करू नका, संजय राऊतांना सुनावले!

… म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकाराला विमानातून उतरवलं

संजय राऊत यांच्यापेक्षा शकुनी मामा बरा!

राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्यातील नेते, प्रमुख नेतृत्व, विशेष निमंत्रित या सर्वांची मिळून जवळपास १२०० जणांची टीम होणार आहेया कार्यकारिणीच्या माध्यमातून २०२४ च्या महाविजयासाठी आम्ही सज्ज असणार आहोत. त्यात ४८ लोकसभा आणि २०० हून अधिक विधानसभा युतीत जिंकण्याचाविश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

अशी आहे नवीन प्रदेश कार्यकारिणी :
१६ उपाध्यक्ष , ६ सरचिटणीस, १६ चिटणीस, ६४ कार्यकारिणी सदस्य, २६४ विशेष निमंत्रित सदस्य आणि ५१२ निमंत्रित सदस्यांचा समावेश आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा