30.6 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
घरराजकारणशरद पवार हेच राष्ट्रवादीतील भोंदूबाबा; उद्धव ठाकरेंवर त्यांनी जादू केली

शरद पवार हेच राष्ट्रवादीतील भोंदूबाबा; उद्धव ठाकरेंवर त्यांनी जादू केली

चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला

Google News Follow

Related

भाजप प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे . शरद पवार हेच राष्ट्रवादीतील भोंदूबाबा आहेत. राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंवर जादू केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेही त्यांच्यासारखाच विचार करू लागले आहेत.त्यातून सुटणार नाही असा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी सत्तेचे स्वप्न सोडावे. आजही त्यांना सत्ता गेली असे वाटत नाही. जयंतरावांनी काळजी करू नये. आम्ही पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही. पुढील निवडणुकीत आमचे २०० आमदार निवडून येतील, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

राष्ट्रवादीने बेईमानी करून सत्ता स्थापन करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंवर जादू केली आणि त्यामुळे उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत गेले. त्यामुळे उद्धव ठाकरे आपला विचार बदलून पवार साहेबांकडे गेले, पण आता आपण इतके सावध आहोत की आपण शिंदे आणि फडणवीस पुढच्या टर्ममध्ये २०० हून अधिक आमदार निवडून आणू असे बावनकुळे म्हणाले.

हे ही वाचा:

शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८६५ वधारला तर निफ्टीतही वाढ

छत्रपती शिवाजी महाराजांची ‘ती’ ऐतिहासिक तलवार येणार महाराष्ट्रात?

मुख्यमंत्री, पंतप्रधान सडक योजनेतून राज्याला ४०० कोटी

संजय राऊत फडणवीसांना भेटणार; मातोश्रीवर संशयाचा ९ किमी लांबीचा ढग

उद्धव ठाकरेंचे कौतुक कराल का? असा प्रश्न बावनकुळे यांना विचारला. त्यावर बावनकुळे यांनी उत्तर दिले. आता उद्धव ठाकरेंना फक्त काँग्रेस पक्षाची घटना मान्य करायची आहे. बाकी सर्व त्याने स्वीकारले आहे. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या घटनेची डुप्लिकेट प्रत काढून निवडणूक आयोगाला सादर करावी, अशी सूचनाही बावनकुळे यांनी केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा