33 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरराजकारणबाळासाहेबांचे विचार मोडून तोडून टाकणे ही लफंगेगिरीचं

बाळासाहेबांचे विचार मोडून तोडून टाकणे ही लफंगेगिरीचं

Google News Follow

Related

उद्धव ठाकरे यांनी महामोर्चा सभेमध्ये शिंदे सरकारवर लफंगे अशी टीका केली होती. ठाकरे यांच्या लफंगे शब्दाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाचार घेतला आहे. लफंगे कोण हे महाराष्ट्राने बघितले आहे. सत्ता मिळवण्यासाठी बाळासाहेबांचे विचार कोणी मोडून तोडून टाकले. ज्या पक्षाबरोबर निवडणूक लढवली त्यांच्या पाठीत खंजीर खुपसणे  लफंगेगिरीच आहे. मतदारांशी केलेली बेईमानी आहे अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

उद्धव ठाकरे यांनी महामोर्चा हा विशाल असल्याचे म्हटले होते त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, तीनही पक्षांनी एवढी मेहनत घेतली, किती बैठका घेतल्या, किती तयारी केली, आणि मोर्चा आपण पाहिलेला आहे की त्याला किती यश मिळालं आहे. चार-चार बैठक घेऊन मोर्चा यशस्वी करता आला नाही. काल कोकणात सभा होती त्या सभेला या मोर्चापेक्षा जास्त माणसे होती. राज्य सरकारचं काम पाहून विरोधकांची पायाखालची जमीन सरकलीय. तीन-तीन पक्षांनी काढलेल्या या मोर्चासाठी इतर पक्ष तसेच डावे विचारसारणीच्या लोकांची मदत घ्यावी लागली. मुंबईत भगवा झेंड्यापेक्षा इतर झेंडे जास्त दिसत होते. हे चांगले चित्र नाही. सरकारच्या कामाची धास्ती घेतली आणि घरात असलेले बाहेर पडले आणि बाहेर होते ते रस्त्यावर उतरले चांगली गोष्ट आहे असे मुख्यमंत्री मिश्किल शब्दात म्हणाले.

हे ही वाचा:

महापुरुषांसाठी की शिंदे-फडणवीस सरकारला विरोध करण्यासाठी महामोर्चा?

उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल

‘अरुणाचलच्या तवांगमध्ये धर्मांतरणाविरोधात लढणारा सैनिक म्हणजे तेची गुबीन’

ठाकरेंचा घँडीवाद

विरोधक सरकार पडण्याच्या वावड्या उठवत आहेत त्याचा समाचार घेताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, नैराश्यापोटी सरकार पाडण्याचे दावे केले जात आहे. कुणी त्यावेळी म्हणालं होतं की एका महिन्यात सरकार पडेल असे म्हणाले होते पण आता पाच महिने झालेत. आता फेब्रुवारीचा मुहूर्त काढला आहे. ते मुहूर्तावर मुहूर्त काढत आहेत. पक्ष वाचवण्यासाठी त्यांना ते करावं लागत. कार्यकर्ते थांबवण्यासाठी ते करावं लागतं. सत्ता गेल्यामुळे ते हताश झाले आहेत. हे सरकार मजबूत आहे. पूर्ण कालावधी सरकार पूर्ण करेल. पुढच्या निवडणुकीतही आमची निवडणुकीतही युती मजबूत असेल आणि विधानसभेच्या निवडणूक जिंकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दुर्दैव की हे आपल्या हिंदू देवतांना शिव्या घालणारे , त्यांचा अपमान करणारे आणि त्यांना पाठीशी घालणारे सर्वजण आणि सावरकरांचा अपमान करणारे व्यासपीठावर होते हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे असेही ते म्हणाले.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा