मुंबई भाजपाचे अध्यक्ष आणि मंत्री आशीष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात बिल्डरांवर केलेल्या मेहेरबानीमुळे आज मुंबईतल्या नागरिकांच्या खिशाला चाट बसली आहे, असा आरोप केला आहे.
आशीष शेलार यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट करत या सगळ्या प्रकरणावर प्रकाश टाकला आहे. त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाचे कारण सांगत तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने सन २०२१ ला बिल्डरांना प्रिमियममध्ये ५०% सूट देण्याचा “घसघशीत” निर्णय घेतला. सामान्य मुंबईकरांना एक रुपयांची मदत केली नाही, पण बिल्डरांच्या ६०० प्रकल्पांवर सुमारे १२ हजार कोटींची खैरात करण्यात आली.
हे ही वाचा:
काँग्रेसचे नेते म्हणतात, ३७० कलम रद्द केल्यामुळे काश्मिरात सुखशांती!
कुख्यात माओवादी नेता कुंजाम हिडमा एके ४७ सह ओडिशात सापडला
शेतकऱ्याच्या मुलाने एनडीए प्रशिक्षणात टॉपर
एलॉन मस्क यांचे ट्रम्प सरकारला टाटा बाय बाय!
शेलार यांनी म्हटले आहे की, मुंबईकरांच्या घरांचे भाव तर कमी झाले नाहीच उलट मुंबई महापालिकेला थेट आर्थिक फटका बसला व पालिकेचे आर्थिक गणित कोलमडले. त्यामुळे कर वाढ करावी लागेल याचे सुतोवाच तत्कालीन पालिका आयुक्तांनी २०२१-२२ पासूनचे पुढचे सगळे अर्थसंकल्प सादर करताना वारंवार केले आहेत. त्यामुळेच आणि त्याचमुळे.. आता मालमत्ता करात वाढ करुन, मुंबई महापालिका बिल्डरांवर खैरात केलेला तो “महाविकास आघाडी कर” मुंबईकरांच्या खिशातून आता वसूल करणार आहे. आमचा महापालिकेला सवाल आहे, ही कर वाढ करुन तुम्ही मुंबईकरांना कोणत्या सेवा- सुविधा देणार आहात?
