34 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरराजकारणकाँग्रेसला स्वतःचेच मुख्यमंत्री डोईजड?

काँग्रेसला स्वतःचेच मुख्यमंत्री डोईजड?

Google News Follow

Related

देशात पंजाब, छत्तीसगढ, राजस्थान अशा मोजक्या राज्यांमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत. पण या तीन राज्यांमधली सत्ताही टिकवणं काँग्रेसला जड जाताना दिसत आहे. भाजपासारख्या विरोधी पक्षाकडून नव्हे तर काँग्रेच्या अंतर्गत संघर्षातच काँग्रेस बेजार होताना दिसतेय. सध्या दिल्लीत एकाचवेळी पंजाब आणि छत्तीसगढमधल्या अंतर्गत संघर्षानं काँग्रेसमध्ये वातावरण तापलेलं आहे.

“मला निर्णय करण्याचं स्वातंत्र्य द्या, नाहीतर पक्षाचं वाटोळं होईल.” असे थेट इशारा नवज्योतसिंह सिद्धू यांनी आपल्याच पक्षाला दिला आहे. तर दुसरीकडे पंजाब काँग्रेसचे मनीष तिवारी यांनीही सिद्धुयांच्यावर सवाल केले आहेत. “सिद्धु यांनी केलं की सगळं माफ कसं? आणि आम्ही जरा आवाज केल्यावर आमची कारवाई का?”

पंजाबमध्ये प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यानंतर सिद्धु नरमतील, कॅप्टन आणि त्यांच्यातला वाद संपुष्टात येईल असं काँग्रेसला वाटलं होतं..पण हा वाद काही थांबण्याचं नाव घेत नाही. आता नवं नाटय घडलं आहे. सिद्धु भारतविरोधी वक्तव्य देणाऱ्या त्यांच्या सल्लागाराला हटवण्याची कारवाई पक्षानं केली आहे.

मलविंदर माली यांना सिद्धु यांनी सल्लागार म्हणून नियुक्त केलं होतं. पण या मालींनी काही दिवसांपूर्वी पाकिस्तान आणि काश्मीरबद्दल एक वादग्रस्त विधान केलं. काश्मीर हा भारताचा भाग नाहीच असं वक्तव्य माली यांनी केलं होतं. हीच संधी साधत कॅप्टन अमरिंदर यांचा ग्रुप सिद्धुंविरोधात आक्रमक झाला आणि त्यांनी दिल्लीतून दबाव टाकत त्यांना हटवण्याची कारवाई घडवून आणली. त्यामुळे सिद्धु चांगलेच संतापले आणि त्यांनी पक्षाला हा इशारा देऊन टाकला..

काल पुन्हा पंजाबचे प्रभारी हरीष रावत दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेत होते..कॅप्टन अमरिंदर यांचे काही समर्थक दिल्लीत पोहचले. पुढच्या वर्षी पंजाबच्या निवडणुका होतायत. पण अवघे काही महिने उरले असतानाही हा वाद काही थांबायला तयार नाहीय. एकीकडे सिद्धु यांच्या सल्लागारावर कारवाई आणि दुसरीकडे पंजाब प्रभारी हरीष रावत यांनी निवडणुका कॅप्टन अमरिंदर यांच्याच नेतृत्वातच होतील असं सांगितल्यानं सिद्धु पुन्हा अस्वस्थ झालेत.

हे ही वाचा:

काय आहे मोदी सरकारने आणलेली भारत सिरीज?

पानिपत होण्याच्या भीतीनेच ठाकरे सरकार निवडणुका पुढे ढकलत आहे

रोनाल्डोची घरपावसी

अमेरिकेने घेतला १३ जवानांचा बदला

काँग्रेससाठी जी डोकेदुखी पंजाबमधे सुरु आहे, तशीच छत्तीसगढमध्येही चाललीय. विद्यमान मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि त्यांचे पक्षांतर्गत विरोधक टी ए सिंह देव यांच्यात खुर्चीसाठी सामना रंगलाय. अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला होता, त्यामुळे आता बघेल यांना हटवून मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळावं यासाठी टी ए सिंह देव दबाव टाकतायत. तर दुसरीकडे बघेल अशा फॉर्म्युल्याचं रडगाणं थांबवावं असं सांगतायत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा