29 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
घरराजकारणसनातन विरोधी घोषणा देऊ शकत नाही म्हणत काँग्रेस नेत्याचा पक्षाला रामराम

सनातन विरोधी घोषणा देऊ शकत नाही म्हणत काँग्रेस नेत्याचा पक्षाला रामराम

पक्षाची भूमिका न पटल्याने राजस्थानमधील नेते गौरव वल्लभ यांचा राजीनामा

Google News Follow

Related

आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला देशपातळीवर जबरदस्त गळती लागलेली असताना आता आणखी एका नेत्याने काँग्रेसला रामराम ठोकला आहे. काँग्रेस पक्षाचे नेते गौरव वल्लभ यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर लोकसभा निवडणुकीचे महत्त्व लक्षात घेता हा काँग्रेस पक्षाला बसलेला मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. गौरव वल्लभ यांनी २०२३ मध्ये राजस्थानच्या उदयपूर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत भाजपा उमेदवाराने ३२ हजार मतांच्या फरकाने त्यांच्यावर विजय मिळवला होता.

काँग्रेसपक्षाच्या सुरू असलेल्या वाटचालीवर त्यांनी चिंता व्यक्त करत नाराजी दाखविली आहे. “काँग्रेस पक्ष दिशाहीन होऊन पुढे चालला आहे. यात अनेक गोष्टी खटकत आहेत. मी सनातन विरोधी घोषणा देऊ शकत नाही. सकाळ-संध्याकाळ वेल्थ क्रिएटर्सला शिव्या देऊ शकत नाही. म्हणून मी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देतोय,” असं म्हणत गौरव वल्लभ यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

“काँग्रेसचा तळा-गाळातील संपर्क तुटला आहे. मोठे नेते आणि जनमाणसात काम करणारे कार्यकर्ते यांच्यातील अंतर कमी करणं कठीण आहे,” असं गौरव वल्लभ यांनी म्हटलं आहे. अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमासंदर्भातली काँग्रेसच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं. “राम मंदिर प्राण प्रतिष्ठेसंदर्भात काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर मी नाराज आहे. मी जन्माने हिंदू आणि कर्माने शिक्षक आहे. पक्षाची ही भूमिका मला पटली नाही. पार्टी आणि आघाडीतील अनेक नेते सनातन विरोधी बोलत असतात. पक्षाचे यावर गप्प रहाण हे मूक संमती देण्यासारख आहे,” अशी टीका गौरव वल्लभ यांनी केली आहे.

हे ही वाचा:

मोदी सरकारच्या यशस्वी बचाव मोहिमा; मोदी ठरले संकटमोचक!

३६ टक्के आयआयटी मुंबईचे पदवीधर नोकऱ्या मिळवण्यात अपयशी!

संजय निरुपम यांनी केलं स्पष्ट; आधी राजीनामा नंतर हकालपट्टी

“आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला भक्कम बनविण्यासाठी पंतप्रधान मोदींनी दहा वर्षात पाया रचला”

“सध्या काँग्रेस पक्षाची चुकीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. एकाबाजूला आपण जाती आधारित जनगणनेबद्दल बोलत आहोत. दुसऱ्या बाजूला हिंदू समाज विरोधी दिसतोय. हे काँग्रेसच्या मूलभूत सिद्धांताविरोधात आहे,”असं गौरव वल्लभ यांनी म्हटलं आहे. काँग्रेस पक्ष देशाच्या वेल्थ क्रिएटर्सना कमीपणा दाखवण, त्यांना शिव्या देण्याच काम करतोय. आज आपण उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरणाच्या धोरणांच्या विरोधात आहोत. ही धोरण देशात लागू करण्याच श्रेय जगाने नेहमीच आपल्याला दिलं. आपल्या देशात बिजनेस करुन पैसा कमावण चुकीचं आहे का? असा तिखट प्रश्न गौरव वल्लभ यांनी उपस्थित केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
146,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा