28 C
Mumbai
Sunday, December 8, 2024
घरराजकारणउत्तर प्रदेशात काँग्रेसच्या अस्तित्वावर संकट

उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या अस्तित्वावर संकट

कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशातून काँग्रेसचा एकही सदस्य राज्यसभेवर नाही… उत्तर प्रदेशातील वरिष्ठ काँग्रेसनेते प्रमोद तिवारी राज्यसभेत राजस्थानची बाजू मांडत आहेत… उत्तर प्रदेश विधानपरिषदेत काँग्रेसचा एकही सदस्य नाही… उत्तर प्रदेश विधानसभेत काँग्रेसचे अवघे दोन आमदार आहेत… कोणे एकेकाळी उत्तर प्रदेशातील ८५ जागांपैकी ८३ जागांवर विजय मिळवणाऱ्या काँग्रेसकडे आज उत्तर प्रदेशातून लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी एकही विद्यमान खासदार नाही, हेदेखील सत्य आहे.

काँग्रेसवर आता राज्यांत केवळ १७ जागा लढवण्याची वेळ आली आहे. त्यांना समाजवादी पक्षाशी आघाडी करावी लागली आहे. इतकेच नव्हे तर, सोनिया गांधी यादेखील रायबरेलीमधून यंदा निवडणूक लढवणार नाहीत. स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केल्यानंतर ते अमेठीत परतरण्याची चिन्हे नाहीत. काँग्रेसने त्यांची शेवटची आशा प्रियंका गांधी वाड्रा यांच्यावर राष्ट्रीय सरचिटणीसच्या रूपात उत्तर प्रदेशच्या प्रभारी म्हणून कामगिरी सोपवली. मात्र त्याही अपयशी ठरल्या. त्या उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवतील का, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. काँग्रेस उत्तर प्रदेशात जागा वाढवेल की सन १९७७ आणि १९९८मधील शून्य जागेच्या इतिहासाची पुन्हा नोंद करेल, हे लवकरच कळेल.

हे ही वाचा:

टीएमसीच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्या संबंधित ठिकाणांवर सीबीआयकडून धाडसत्र

सीएए लागू झाला नसता तर भाजपचे बंगालमध्ये झाले असते नुकसान

इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांचा मॉस्कोमध्ये हल्ला; ६० जणांचा मृत्यू

२० वर्षांपासून फरार असलेल्या गँगस्टर प्रसाद पुजारीचं चीनमधून भारतात प्रत्यार्पण

ही आहेत आव्हाने

२०१९- केवळ सोनिया यांचा विजय, राहुल यांचा पराभव. मतटक्का ६.३६ टक्के. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ८०पैकी ६७ जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी केवळ एकमेव जागा सोनिया गांधी जिंकली होती. राहुल गांधी यांचाही पराभव झाला होता.

२०२२- विधानसभा निवडणुकीत केवळ दोनच उमेदवार जिंकले होते. मतटक्का होता केवळ २.३३ टक्के.
२०२२- समाजवादी पक्षाशी आघाडी करून काँग्रेसला ज्या १७ जागा मिळाल्या आहेत, त्यातील अनेक जागांवर पक्षाच्या उमेदवाराची अनामत रक्कमही जप्त झाली होती. यात अमरोहा, गाजियाबाद, फतेहपूर सिकरी, झांसी, बाराबंकी, अलाहाबाद, महाराजगंज, देवरिया आणि वाराणसी या जागांचा समावेश आहे.

सातत्याने घटता जनाधार

सन २००४मध्ये काँग्रेसने ७३ जागा लढवल्या होत्या. त्यातील अवघ्या नऊ जागा पक्षाला जिंकता आल्या होत्या. उर्वरित जागा लोकजनशक्ती किंवा काँग्रेस समर्थक अपक्ष उमेदवारांना सोडल्या होत्या. मात्र हे आघाडी पक्ष आणि समर्थक एकही जागा जिंकू शकले नव्हते. काँग्रेसचा मतटक्का तेव्हा १२.१८ टक्के होता.
२००९- काँग्रेसने ६९ जागांवर निवडणूक लढवली होती. त्यातील २१ जागाच पक्षाला जिंकता आल्या. मतटक्का वाढून १८.२५ टक्के झाला.
२०१४ – आरएलडी आणि महान दलाशी आघाडी करूनही काँग्रेस केवळ अमेठी आणि रायबरेलीच्या जागा जिंकू शकली.
२०१९- काँग्रेस पुन्हा एकट्यानेच मैदानात उतरली आणि ६७ जागांवर निवडणुका लढवल्या. त्यातील केवळ एक जागा तीही सोनिया गांधी यांना जिंकता आली.

केवळ ‘सपा’वर मदार

काँग्रेस यंदा विजयासाठी केवळ समाजवादी पक्षावर निर्भर आहे. काँग्रेसला समाजवादी पक्षाला सोबत करणारे यादव व मुस्लिमांसह भाजपच्या विरोधात मतदान करणाऱ्या मतदारांकडून मोठी अपेक्षा आहे. मात्र सुभासपा, राष्ट्रीय लोकदल आणि अपना दल कमेरेवादी यांच्याशिवाय स्वामीप्रसाद मौर्य व दारासिंह चौहान यांच्यासारख्या नेत्यांनी सपाची साथ सोडल्यानंतर सपाची ताकद कमी झाली आहे.

संघटनात्मक पाया कमकुवत, स्थानिक करिश्म्यावर मदार

काँग्रेस दीर्घकाळापासून उत्तर प्रदेशात मजबूत संघटनात्मक पाया तयार करू शकलेली नाही. निवडणुका जवळ आल्यानंतर पूर्व मंत्री अजय राय यांची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. राय यांना संघटनात्मक बांधणी करण्याऐवजी सरळ निवडणुकीच्या तयारीला जुंपावे लागले. भाजपने ८०पैकी ५१ व ‘सपा’ने सुमारे ४४ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र काँग्रेसचे उमेदवार अजूनही जाहीर होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे उमेदवारांना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कमी वेळ मिळणार आहे. त्यामुळे उमेदवारांचा व्यक्तिगत जनाधार आणि करिश्माच काँग्रेसला साह्यभूत ठरू शकणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
210,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा