28 C
Mumbai
Friday, August 6, 2021
घरराजकारणजिन्ना हाऊस म्हणजे फाळणीचे दुःखद स्मृतिस्थळ

जिन्ना हाऊस म्हणजे फाळणीचे दुःखद स्मृतिस्थळ

Related

जिन्ना हाऊसचे रूपांतर कल्चरल सेंटरमध्ये करा

‘मुंबईतील जिन्ना हाऊसचे अधिग्रहण करून तेथे कल्चरल सेंटर सुरू करण्यात यावे’ अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना यासंबंधीचे निवेदन देऊन लोढा यांनी ही मागणी केली.

भाजपाचे मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा हे मलबार हिल विधानसभा क्षेत्रातून आमदार म्हणून निवडून येतात. मोहम्मद अली जिन्ना यांचे प्रसिद्ध असे जिन्ना हाऊस त्यांच्या विधानसभा क्षेत्रात उभे आहे. हे जिन्ना हाऊस भारताच्या सरकारने अधिग्रहित करून तिथे साउथ एशिया सेंटर फॉर आर्ट अँड कल्चर सेंटर हे सुरू करावे अशी मागणी लोढा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केली आहे. मंगल प्रभात लोढा यांनी मंगळवार २० जुलै रोजी यासंबंधी अमित शहा यांची भेट घेतली.

‘मुंबईतील जिन्ना हाऊस हे भारताच्या विभाजनाची आठवण करून देणारे आहे’ असे लोढा यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात याच जिन्ना हाऊसमध्ये मोहम्मद अली जिन्ना यांनी जवळपास एक दशक भारताचे तीन तुकडे करण्याचे षडयंत्र रचले आणि त्यात ते सफलही झाले. त्यामुळे ‘हे जिन्ना हाऊस म्हणजे भारताच्या फाळणीचे दुःखद असे स्मृतिस्थळ आहे.’ असा घणाघात लोढा यांनी केला आहे.

हे ही वाचा:

‘आमचे उद्धव काका’ या विषयावर आता निबंध!

…अन्यथा भाजपच्यावतीने तीव्र आंदोलन करणार

‘विस्मरणा’मुळे संजय राऊत झाले निःशब्द!

२०३२ चे ऑलिम्पिक ‘या’ शहरात होणार…

२०१७ साली भारत सरकारने ४९ वर्ष जुन्या अशा शत्रू संपत्ती अधिनियमात सुधारणा करत हे सुनिश्चित केले होते की विभाजनानंतर जे लोक पाकिस्तानात जाऊन वसले आहेत त्यांच्या भारतातील संपत्तीवर त्यांच्या वारसदारांचा किंवा नातेवाईकांचा कोणताही अधिकार नसेल. त्याच्यावर पूर्ण हक्क भारत सरकारचा असेल. आजवर अशा ९२८० संपत्तींचा सरकारमार्फत लिलाव करण्यात आला आहे.

याच प्रकारे जिन्ना हाऊसमध्ये ‘साउथ एशिया सेंटर फॉर आर्ट अँड कल्चर सेंटर’ सुरू करून त्याच्या संस्कृतीक कामकाज सुरू करण्याची सरकारची योजना होती. त्या संदर्भातील एक फलकही जिन्ना हाऊसच्या मुख्य दरवाज्यावर लावण्यात आला आहे. त्यानुसार सरकारने या जिन्ना हाऊसचे अधिग्रहण करून प्रस्तावानुसार तिथे साउथ एशिया सेंटर फॉर आर्ट अँड कल्चर सेंटरची स्थापना करण्याची प्रक्रिया सुरु करावी अशी मागणी आमदार लोढा यांनी आपल्या निवेदनात केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,319अनुयायीअनुकरण करा
2,170सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा