29 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरविशेषपुढील पाच दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कायम

पुढील पाच दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कायम

Google News Follow

Related

राज्यातल्या बहुतांश भागात पावसानं थैमान घातलं आहे. पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यात सगळीकडे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज आणि उद्या मुंबईसह राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, पुण्यातील घाट माथ्यावर अतिवृष्टीचा तर कोल्हापुरातल्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. मराठवाड्यात देखील पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भातल्या नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम आणि अकोला जिल्ह्यातील काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे.

दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टी भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने कोकण आणि गोव्यात मुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी अतिमुसळधार पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मुंबईसाठी आज रेड अलर्ट, तर उद्यासाठी ऑरेंज अलर्ट म्हणजे आज २४ तासात काही ठिकाणी २१० मिमीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज तर उद्या १००-२०० मिमी पावसाचे प्रमाण राहणार आहे. वारे वेगाने वाहणार असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.

वादळामुळे बंदरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मच्छीमारांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छ‌मिारांनी समुद्रात सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत.  चोवीस तासात पावसाची शक्यता आहे.

हे ही वाचा:

विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना ५० हजार रुपये द्या

…अन्यथा भाजपच्यावतीने तीव्र आंदोलन करणार

२०३२ चे ऑलिम्पिक ‘या’ शहरात होणार…

प्राथमिक शाळा सुरु कराव्यात

मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि पुण्यातील घाट माथ्यावर अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. कोल्हापुरातल्या घाट क्षेत्रातही अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भातही अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम आणि अकोला जिल्ह्यातील काही ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा