27 C
Mumbai
Thursday, December 1, 2022
घरराजकारणदीपाली सय्यद आणि काजवे

दीपाली सय्यद आणि काजवे

दीपाली सय्यद, सुषमा अंधारे आणि भास्कर जाधव हे राजकारणातील काजवे

Google News Follow

Related

सूर्य हा सगळ्यांना प्रकाशित करतो आणि तो स्वतः तेजपुंज असतो. पण काजवे स्वतः प्रकाश निर्माण करत असले तरी ते सूर्य ठरत नाहीत. थोड्याफार कुतूहलाच्या पलीकडे ते जात नाहीत आणि सूर्याच्या प्रकाशात तर त्यांना कोणतीही किंमत नसते. राजकारणातही असे अनेक काजवे चमकत असतात, आकर्षित करत असतात पण म्हणून ते सूर्य ठरत नाहीत. मीडिया अशाच काजव्यांना सूर्य म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करते पण लोकांना त्यांची खरी पात्रता ठाऊक असते. दीपाली सय्यद, सुषमा अंधारे, भास्कर जाधव हे राजकारणातील असे काजवे, जे चमकत राहतात, चमकण्यासाठी प्रयत्न करतात.

दीपाली सय्यद नुकत्याचं शिंदे गटात सामील झाल्या. त्या तसेही कोणत्या गटात आहेत म्हणून त्या पक्षाला, गटाला काहीही फरक पडलेला दिसत नाही. त्याप्रमाणे त्या उद्धव ठाकरे गटात होत्या म्हणून कुणाला फरक पडला नाही आणि आता शिंदे गटात आहेत म्हणूनही तितकासा फरक पडत नाही. याच दीपाली सय्यद आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना थकत नव्हत्या आता त्या उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर टीका करताहेत. गेल्या अनेक दिवसांपासून दीपाली सय्यद या वेट अँड वॉचच्या भूमिकेत होत्या त्या बाळासाहेबांची शिवसेना अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणार की नाही अशी चर्चा सुरु होती. अखेर बुधवारी त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. येत्या शनिवारी त्या शिंदे गटात प्रवेश करणारहेत.

सय्यद यांनी त्यांनी त्यांची भूमिका जाहीर केली आणि त्याच वेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. एका राजकीय नेत्याने वैयक्तिक टीका करणं अत्यंत चुकीचं आहे. कालपरवापर्यंत दीपाली सय्यद ह्या पंतप्रधान मोदी आणि भाजपाच्या नेत्यांवर टीका करत होत्या. आज निर्णय जाहीर केला आणि क्षणात त्यांनी रश्मी ठाकरेंवर टीका केलीय. एकनाथ शिंदे आणि आमदारांनी बंड केलं त्या दिवसापासून त्यांनी वैयक्तिक पातळीवर उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केल्याचं एकदाही आढळून आलेलं नाही. कारण त्यांची शिवसेनेशी असलेली निष्ठा आणि बाळासाहेबांची शिकवण. राजकीय वर्तुळात पक्षावर टीका होतं असतात. पण वैयक्तिक पातळीवर टीका करणं कितपत योग्य आहे.

मातोश्रीवर खोके येणं बंद झाल्याने रश्मी वैहिनींना दुःख झालंय. नीलम गोऱ्हे, सुषमा ताई चिल्लर आहेत, याचा सूत्रधार तर रश्मी वैहिनी आहेत, अशी टीका सय्यद यांनी रश्मी ठाकरेंवर केली. म्हणजे मातोश्रीवर खोके जायचे याची चर्चा तर सर्वसामान्यांमध्येसुद्धा सुरु आहेच. पण दीपाली सय्यद या पक्षात एका भूमिकेत आहेत त्यांनी एवढ्या खालच्या पातळीला जाऊन टीका करणं चुकीचं आहे. असे नेते जे वैयक्तिक पातळीवर टीका करतात त्यांची पात्रता किंवा पक्षनिष्ठा विचारांची निष्ठा नसते. मीडियामध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेण्यासाठी प्रमुख, प्रतिष्ठित नेत्यावर टीका करायची. असे वैयक्तिव पातळीवर टीका करणारे नेते कधी कोणत्या पक्षाचे नसतात स्वतःला प्रसिद्धी कशी मिळेल हे बघताना आपण कोणावर काय टीका करतो याचं भान न ठेवणं असं यांचं सुरु असत. सतत मीडियाच्या माध्यमातून चर्चेत कस राहता येईल हे पाहिलं जातं.

भास्कर जाधव, सुषमा अंधारे हे सुद्धा अश्याच प्रकारे वैयक्तिक पातळीवर टीका करत असतात. सुषमा अंधारे या महाविकास आघाडी स्थापन व्हायच्या आधी ठाकरे गटावर वैयक्तिक पातळीवर टीका करायच्या आज त्यांचे जे पक्षप्रमुख आहेत त्या उद्धव ठाकरेंचे एकरी नाव घेत त्यांच्यावर खालच्या पातळीत टीका करायच्या. त्याच उद्धव ठाकरेंची साथ द्यायला त्या ठाकरे गटात आल्या. बुधवरी संजय राऊत यांना जामीन मिळाला तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले होते एकेकाळी याच अंधारे ठाकरे गटावर टीका करताना थकत नव्हत्या.

दीपाली सय्यद यांचा पक्षात अजून प्रवेशही झाला नाही तोवर वैयक्तिक टीका करायला सुरुवात केली. हा त्यांनी त्यांची भूमिका मांडली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कार्यकर्त्यांना वेळ देतात कार्यकर्त्यांची कामं लोकांपर्यंत पोहचवतात. हे सगळं बरोबर आहे त्यामुळेच अनेक कार्यकर्ते एकनाथ शिंदेंना पाठिंबा देताहेत. पण ही भूमिका असताना एकाच वेळी दोन दगडांवर पाय ठेवणं चुकीचं आहे. ठाकरे गटात असताना त्यांनी पंतप्रधान मोदी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीला जाऊन टीका केली. आज त्यांनी त्यांचा निर्णय जाहीर केला मग त्यांनी रश्मी ठाकरे यांवर टीका केली. ठाकरेंवर नाराज होऊन त्यांनी त्यांची भूमिका बदलली का? तस असेल तरी एक विचारांची निष्ठा असते. त्या निष्ठेप्रमाणे सध्या बाळासाहेबांची शिवसेना चालली आहे. ते नाराज होऊन वेगळे झाले पण निष्ठा सोडली नाही.

हे ही वाचा:

विवियाना मॉल मारहाण प्रकरणी आव्हाडांना अटक

मोरबी दुर्घटनेत प्राण वाचवणाऱ्या माजी आमदाराला भाजपाकडून बक्षीस

शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८६५ वधारला तर निफ्टीतही वाढ

छत्रपती शिवाजी महाराजांची ‘ती’ ऐतिहासिक तलवार येणार महाराष्ट्रात?

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र यायला पाहिजेत असं मतं सय्यद यांनी वारंवार मांडलं होत. त्यावेळी त्या म्हणायच्या मला दोन्ही नेते सारखेच असं असताना रश्मी ठाकरेंवर वैयक्तिक टीका करणं चुकीचं आहे. त्यांनी यावेळी संजय राऊत यांच्यावरसुद्धा टीका केली. संजय राऊत यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळालीय. पक्ष तोंडाने कसा फोडायचा याचं उत्तम उदाहरण म्हणजे संजय राऊत. हे आरोप संजय राऊतांवर तर होतच असतात एकनाथ शिंदे आमदार आणि ठाकरे कुटुंबीय यांच्यात दुरावा संजय राऊत यांनी निर्माण केला अशी टीका त्यांच्यावर होत असतेच. त्यामुळे दीपाली सय्यद यांनी त्यांची भूमिका सांगितली हे जरी योग्य असलं तरी त्या ज्या पद्धतीने वैयक्तिक पातळीवर टीका करतात हे चुकीचं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,950चाहतेआवड दर्शवा
1,976अनुयायीअनुकरण करा
52,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा