26 C
Mumbai
Tuesday, March 28, 2023
घरक्राईमनामादेवेंद्र फडणवीस यांचा नवा बॉम्ब; मला, पत्नीला अडकविण्याचा डाव

देवेंद्र फडणवीस यांचा नवा बॉम्ब; मला, पत्नीला अडकविण्याचा डाव

अमृता फडणवीस यांना लाच देऊ करणाऱ्या तरुणीच्या अटकेनंतर नव्या बाबी आल्या समोर

Google News Follow

Related

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना १ कोटीची लाच देऊ करणाऱ्या अनिक्षा नावाच्या तरुणीला ताब्यात घेण्यात आले आहे. ती अटक करण्यात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्याबद्दलचे स्पष्टीकरण विधानसभेतही दिले आणि पत्रकारांनाही त्याची माहिती दिली. त्यात आपल्याविरोधात कारस्थान करण्याचा हा आणखी एक प्रयत्न असल्याचे फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले की, मी यासंदर्भात विधानसभेत निवेदन केले. माझी पत्नी अमृता यांनी एक एफआयरदाखल केला आहे. ज्यात त्यांच्या माध्यमातून भ्रष्टाचार करून ब्लॅकमेल करून दबाव आणून कशापद्धतीने आपल्या केसेस मागे घेणे, याचा प्रयत्न केला गेला. त्याबद्दल हा एफआयआर आहे. अनिल जयसिंघानी हा एक बुकी आहे. जो चार पाच वर्षांपासून फरार आहे. देशात १४ केसेस आहेत त्याच्यावर. अनिक्षा ही त्याची मुलगी असून ती सुशिक्षित आहे. त्यांनी २०१५-१६मध्ये माझ्या पत्नीशी संपर्क साधला. नंतर संपर्क नव्हता. मविआ सरकार आल्यावर २०२१ पासून ती पुन्हा पत्नीच्या संपर्कात आली. ड्रेस डिझायनर आहे. मी डिझाईन केलेले कपडे परिधान करा.  ज्वेलरीचेही काम मी पाहते. हळूहळू माझ्या पत्नीला विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला.

फडणवीस यांनी अनिक्षाबद्दल पुढे सांगितले की, या महिलेने तिच्या दिवंगत आईवर पुस्तक लिहिले त्याचे अनावरण करण्यासाठी प्रयत्न केले. ५० महिलांमध्ये मी आहे माझे स्वागत करा असे सांगून जवळ आली. मग एखादा प्रयत्न केला की, माझे वडील पोलिसांना माहिती देऊन बुकींना पकडून देत. त्याबदल्यात त्यांना पैसे मिळत. यासंदर्भात मला मदत करा. हे आमचे सरकार आले तेव्हा हे बोलायला तिने सुरुवात केली. तेव्हा पत्नीने हे माझे काम नाही असे स्पष्ट सांगितले.

जेव्हा ती म्हणाली की, माझ्या वडिलांना फसवले आहे, त्यांच्यावर चुकीच्या केसेस आहेत. त्यासंदर्भात पत्नीने सांगितले की, आपण तसे निवेदन उपमुख्यमंत्र्यांना द्या. ते याबद्दल काय करता येईल ते पाहतील. पण हळूहळू लक्षात आले की, ही काहीतरी चुकीचे काम करत आहे. एकदा तिने असे म्हटले की, माझ्या वडिलांना यातून सोडविण्यासाठी आम्ही १ कोटी द्यायला तयार आहोत. आणखीही अनेक गोष्टी सांगितल्या. मग माझ्या पत्नीने तिला मोबाईलवर ब्लॉक केले. दोन दिवसांनंतर अज्ञात नंबरवरून काही मेसेजेस आणि व्हीडिओ आले. ते अनिल जयसिघांनी यांनी पाठवले होते. अनिक्षाला अनब्लॉक करा असेही त्यांनी सांगितले. आमच्यावरील सगळ्या केसेस मागे घ्या म्हणून सांगितले. इतरही मागण्या केल्या जर तसे केले नाही तर आम्ही हे व्हीडिओ सार्वजनिक करू, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा:

पित्रोडा म्हणतात, भारताविरोधात परदेशात का बोलायचे नाही? समस्या काय आहे?

दहशतवादाने ग्रस्त देशात पाकिस्तानने अफगाणिस्तानलाही टाकले मागे

पोटातल्या गर्भाच्या द्राक्षाएवढ्या हृदयावर शस्त्रक्रिया

भारतीय वंशाच्या नीलला अमेरिकेत मिळाली अडीच लाख डॉलर्स

हे व्हीडिओ काय आहेत तर अनिक्षा पत्नीला हार घालत आहे, अंगठी घालत आहे. हे ठीक आहे. त्यात एका व्हीडिओत ती बाहेर एका बॅगेत पैसे भरून तशीच बॅग माझ्या घरातील काम करणाऱ्या महिलेला देत आहे. आणि तिचे म्हणणे आहे की, मी पत्नीला पैसे दिले आहेत. हे व्हीडिओ आल्यावर मी एफआयआर करायला लावले. त्याची न्यायवैद्यक चाचणीसाठी पाठवले, असे सांगून फडणवीस म्हणाले की, पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे न्यायवैद्यक मध्ये स्पष्ट झाले की, पैसे भरलेली बॅग आणि प्रत्यक्षात दिलेली बॅग ही वेगवेगळी आहे. त्याचा अहवालही आहे. या सगळ्यात इतक्या गोष्टी समोर आल्यात काही नेत्यांची, अधिकाऱ्यांची नावे आलीत. मविआ सरकारच्या काळातील केसेस मागे घेण्यासाठी या कारस्थानाची सुरुवात केली होती. पण सरकार बदलल्यावर आपण ब्लॅकमेल करून केस मागे घ्यावी, असे त्यांना वाटले.

फडणवीस म्हणाले की, व्हीपीएनने जयसिंघांनी बोलत असे. त्याचा अजून शोध सुरू आहे. एफआयआरनंतर कारवाई सुरू झाली पण तो सापडलेला नाही. पोलिस त्याला शोधत आहे. राजकारणात हा खालचा स्तर आहे. त्या व्यक्तीने अशा लोकांची नावे घेतली आहेत पण त्या गोष्टी तपासातूनबाहेर येतील. पोलिस कमिशनरचेही नाव त्याने घेतले आहे. मी त्याबद्दल बोलणार नाही. पण मी माहिती घेतली तेव्हा मविआ सरकार होते. तेव्हा केसेस मागे घेण्याची कारवाई सुरू झाली होती. त्यावर काही नोटिंग झाले होते.

फडणवीस यांनी स्पष्ट केले की, ही व्यक्ती पकडल्यावर सगळे उघड होईल. पोलिसांच्या तपासात मी हस्तक्षेप करणार नाही. मी म्हणॉत होतो की मविआ सरकारमध्ये काही असे प्रयत्न सुरू होते हा नवा प्रयतन होता. मला पुरावे मिळाले की आपल्यासमोर आणेन.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,876चाहतेआवड दर्शवा
2,035अनुयायीअनुकरण करा
65,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा