28.3 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरराजकारण'महाविकास आघाडी सरकारविरोधात रस्त्यावर उतरून एल्गार पुकारावाच लागेल'

‘महाविकास आघाडी सरकारविरोधात रस्त्यावर उतरून एल्गार पुकारावाच लागेल’

Google News Follow

Related

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची आज बैठक पार पडली. त्यावेळी माजी मुख्यमंत्री आणि विधान सभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरले. ‘महाविकास आघाडी सरकारच्या काळात ज्या प्रकारचा अनाचार, दुराचार आणि भ्रष्टाचार पाहायला मिळतोय. त्यावरुन महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून या सरकारचे नाव नोंद होईल’, असे भाषणात बोलत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीत झालेल्या समारोपाच्या भाषणात फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.

आता महाविकास आघाडी सरकारविरोधात रस्त्यावर उतरून एल्गार पुकारावाच लागेल, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ठाकरे सरकारच्या काळात हजारो कोटीची लूट सुरू आहे. पण सामान्य माणसाकडे पाहायला मात्र कुणालाही वेळ नाही. त्यामुळे आता आपल्यालाच या सरकारच्या विरोधात एल्गार पुकारून रस्त्यावर उतरावाच लागेल.

आता कोरोनाच्या बहाण्याने सरकार आपल्याला थांबवू शकत नाही. दोन वर्षे करोना आहे या कारणामुळे ते आम्हाला रोखत होते. आमच्यावर गुन्हे दाखल करत होते. पण आता ते चालणार नाही, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

हे ही वाचा:

आंध्र प्रदेशात भाजपा लवकरच मोठी शक्ती बनेल

काय आहे पूर्वांचल एक्सप्रेसवेचे महत्व?

राज्याला फडणवीसांसारख्या फुलटाईम मुख्यमंत्र्याची गरज

‘अनिल परब हे आडमुठेपणा करत व्हिलन बनत आहेत’

केवळ माजी गृहमंत्री जेलमध्ये आहेत; पण एवढ्यावर हे सिमीत नाही. प्रत्येक विभागात वाझे आहेत. नुकत्याच काही ठिकाणी धाडी पडल्या ज्यात हजार कोटी, पाचशे कोटी, चारशे कोटीची दलाली उघड झाली. पण सामान्य शेतकऱ्यांकडे मात्र वळून पाहायला सरकार तयार नाही. महाराष्ट्रात यापूर्वी अशी अवस्था कधीही पाहिली नव्हती. पुढे कुणाचेही राज्य आले तर महाराष्ट्राला पूर्व पदावर आणण्यासाठी खूप काळ लागेल. कोटी- कोटी रुपये देऊन पोलीस अधिकारी त्या पदावर येत असतील, तर आम्ही त्यांना काय आवाहन करणार की भ्रष्टाचार थांबवा, अशी खंतही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांनाही टोला लगावला आहे. ‘कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू’ असे म्हटले आहे. सकाळी, दुपारी कोंबडा बांग देतो, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा