29 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरराजकारणमहाविकास आघाडीच्या मोर्चामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार

महाविकास आघाडीच्या मोर्चामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार

रिचर्डसन अँड क्रूडासकडून निघणार मोर्चा

Google News Follow

Related

महाविकास आघाडीच्या मोर्चामुळे दक्षिण मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुंबई वाहतूक विभागाने मुंबई सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनासाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. महाविकास आघाडीने छत्रपती शिवरायांच्या अपमानाच्या विरोधात मोर्चा काढला असून त्याला परवानगी देण्यात आली आहे. शनिवारी सकाळी १०वाजता महाविकास आघाडी पक्षाचा मोर्चा नागपाडा येथील रिचर्डस अँड क्रुडास येथून सीएसएमटी च्या दिशेने निघणार आहे. या दरम्यान सीएसएमटीच्या दिशेने जाणारा रिचर्डस अँड क्रुडास कंपनी ते – सर जे. जे. उड्डाणपुल डॉ. दादाभाई नौरोजी रोड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- टाईम्स ऑफ इंडिया इमारत हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. मुंबई वाहतूक विभागाकडून पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.

वाहतुकीकरीता बंद मार्ग रिचर्डसन्स डा मिल- सर जे. जे. उड्डाणपुल डॉ. दादाभाई नौरोजी रोड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- टाईम्स ऑफ इंडिया इमारत.

पर्यायी मार्गाची व्यवस्था वाहनचालक आणि नागरीकांना आपल्या इच्छीत स्थळी पोहचण्याकरीता खालील पर्यायी मार्गाचा वापर करावा.

१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडने दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी गॅस कंपनी – चिंचपोकळी पुलावरून- ‘ऑर्थर रोड-सात रस्ता सर्कल – मुंबई सेंट्रल – डॉ. दादासाहेब भंडकमकर मार्ग (लॅमिग्टन रोड ) – ओपेरा हाऊस – महर्षी कर्वे रोडचा (क्वीन्स रोड) वापर करावा. किंवा सात रस्ता सर्कल – मुंबई सेंट्रल-ताडदेव सर्कल – नाना चौक- एन. एस. पुरंदरे मार्ग या पर्यायी मार्गाचा सुध्दा वापर करू शकतात.

२) भायखळा येथून दक्षिण मुंबईकडे जाण्याकरीता डॉ. बी. ए. रोड खडा पारसी- नागपाडा जंक्शन- दोन टाकी जंक्शन- जे. जे. जंक्शन महम्मद अली रोड याचा वापर करावा. किंवा नागपाडा जंक्शन – मुंबई सेंट्रल-ताडदेव सर्कल-नाना चौक एन. एस. पुरंदरे मार्ग या पर्यायी मार्गाचा सुध्दा वापर करू शकतात.

३) भायखळा / जिजामाता उदयान (राणीची बाग) येथुन दक्षिण मुंबईकडे जाण्यासाठी संत सावता मार्गाने- -मुस्तफा बाजार-रे रोड रिलप रोड-बॅरिस्टर नाथ पै मार्गाने पुढे पी.डीमेलो रोडने पुढे सी.एस.एम.टी. कडून इच्छीत स्थळी.

४) परेल व लालबाग येथून दक्षिण मंबईकडे जाण्याकरीता बावला कंम्पाऊंड टी.बी. कदम मार्गाने व्होल्टस कंपनी उजवे वळण तानाजी मालुसरे मार्ग अल्बर्ट जंक्शन-उजवे वळण बॅरिस्टर नाथ पै मार्गाचा वापर करावा.

हे ही वाचा:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल राऊत यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात लोकांमध्ये संताप

७१ वर्षीय आजोबा शेतात गेले ; नंतर सापडले त्यांचे तुकडे

राजोरीमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात दोन नागरिक ठार

छपरा विषारी दारु दुर्घटनेतील मृतांची संख्या ५० वर

५) मध्य मुंबई कडून दक्षिण मुंबईकडे जाण्यासाठी चार रस्ता-आर. ए. किडवाई मार्गाने बॅरिस्टर नाथ पै मार्गाने – पी.डीमेलो रोडचा वापर करावा.

६) नवी मुंबई, पुणे, ठाणे व नाशिक येथून दक्षिण मुंबईकडे जाण्याकरीता देवनार आयओसी जंक्शन पूर्व – मुक्त मार्ग (Eastern Free way) पी. डिमेलो रोडचा वापर करावा. किंवा नवी मुंबई व पुणे येथून दक्षिण मुंबईकडे जाण्याकरीता चेंदुर पांजरपोळ जंक्शण पूर्व मुक्त मार्ग (Eastern Free way) – पी. डिमेलो रोड याचा वापर करावा.

७) दक्षिण मुंबई येथून उत्तर आणि पश्चिम मुंबई करीता महापालिका मार्ग मेट्रो जंक्शन – जगन्नाथ शंकर शेठ रोड- प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाण पुल – मरीन ड्राईव्ह मार्ग याचा वापर करावा.

८) दक्षिण मुंबई कडून मध्य मुंबई तसेच नवीमुंबई, पुणे, ठाणे व नाशिक करीता पी.डिमेलो रोडचा वापर करून पुर्व मुक्त मार्गे (Eastern Free way) इच्छीतस्थळी जाऊ शकतात.

९) दक्षिण मुंबईकडून मध्य मुंबई करीता महिर्षी कर्वे रोड / मरिन ड्राईव्ह – ओपेरा हाऊस – लॅमिंटन रोड – मुंबई सेंट्रल – सात रस्ता – चिंचपोकळी – डॉ. बी. ए. रोड याचा वापर करावा. किंवा महिर्षी कर्वे रोड / मरिन ड्राईव्ह – नाना चौक ताडदेव सर्कल मुंबई सेंट्रल सात रस्ता – चिंचपोकळी – – – डॉ. बी. ए. रोड याचा वापर करावा. –

१०) सीएसएमटी स्टेशनकडुन पायधुनी, भायखळा, नागपाडा येथे जाण्याकरीता महापालिका मार्ग- मेट्रो जंक्शन- एल.टी. मार्ग चकाला डावे वळण- जे.जे. जंक्शन – दोन टाकी- नागपाडा जंक्शन – खडा पारसी जंक्शन मार्गे इच्छीतस्थळी जाऊ शकतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा