26 C
Mumbai
Friday, September 29, 2023
घरराजकारणमनमोहन सिंग यांच्याकडून मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक

मनमोहन सिंग यांच्याकडून मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक

जी-२० परिषदेनिमित्त माजी पंतप्रधानांनी व्यक्त केली भूमिका

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या सुरू असलेल्या वाटचालीबद्दल माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कौतुकोद्गार काढले आहेत. रशिया युक्रेन संघर्षात भारताची भूमिका खूप महत्त्वाची असल्याची टिप्पणी मनमोहन सिंग यांनी केली आहे. भारताने याबाबतीत अगदी योग्य पाऊल उचलल्याचे सिंग यांनी म्हटले आहे.

 

२००४ ते २०१४ या आपल्या पंतप्रधानपदाच्या काळाशी तुलना करताना आता परराष्ट्र धोरणाचे महत्त्व बरेच वाढीस लागले आहे, असेही मनमोहन सिंग म्हणाले. मनमोहन सिंग यांना जी-२० परिषदेच्या स्नेहभोजनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने इंडियन एक्स्प्रेसने घेतलेल्या मुलाखतीत मनमोहन सिंग यांनी आपली भूमिका व्यक्त केली.

 

 

९० वर्षीय मनमोहन सिंग म्हणाले की, जी-२०च्या अध्यक्षपदाची संधी भारताला मिळाली याचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले. जी-२० परिषदेच्या निमित्ताने विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष इथे येत आहेत, त्याचा मी साक्षीदार असेन. भारतीय प्रशासनाचा विचार करता परराष्ट्र धोरण हे खूप महत्त्वाचे असते पण माझ्या काळाशी तुलना करता आता स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने या परराष्ट्र धोरणाचे महत्त्व खूप वाढले आहे.

 

हे ही वाचा:

पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या संपत्तीवर जप्ती!

राज्यात गडगडाटासह पावसाचे जोरदार कमबॅक

निवडणूक शपथपत्र प्रकरणात देवेंद्र फडणवीस दोषमुक्त

पारशी समुदायाचा उगम मध्य पूर्व आणि दक्षिण आशियाईतला

रशिया युक्रेन युद्धासंदर्भात भारताने जी भूमिका घेतली आहे ती अगदी योग्य असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. दोन देशांत संघर्ष होतो तेव्हा भूमिका घेताना एखादा देश गांगरून जातो पण भारताने आपले सार्वभौमत्व, आर्थिक हितसंबंध याच गल्लत केली नाही. शिवाय, दोन्ही देशांनी शांतता राखावी असे आवाहनही भारताने केले. मनमोहन सिंग म्हणाले की, जी-२० देशांनी परस्परांतील सुरक्षाविषयक मतभेद बाजुला ठेवत हवामान, असमानता, जागतिक बाजारपेठेतील व्यापार यातील समन्वयावर लक्ष केंद्रित करावे.

 

 

चीनच्या प्रश्नावर मनमोहन यांना विचारल्यावर ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यासंदर्भात काही सल्ला देणे मला योग्य वाटत नाही. पण हे दुर्दैवी आहे की, चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी जी-२० परिषदेला उपस्थित राहणे टाळले. मला आशा आहे आणि खात्री आहे की भारताचे पंतप्रधान भारताचे सार्वभौमत्व, आपल्या सीमा यांचे संरक्षण करण्यात कोणतीही कसर ठेवणार नाहीत तसेच दोन्ही देशात तणाव वाढणार नाही, याचीही काळजी घेतील.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,034अनुयायीअनुकरण करा
101,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा