30.4 C
Mumbai
Saturday, May 16, 2026
घरराजकारणफडणवीस-पवार भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

फडणवीस-पवार भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Google News Follow

Related

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांच्या भेटीच्या चर्चेमुळे राज्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. शरद पवार यांच्या प्रकृती संदर्भात चौकशी करण्यासाठी फडणवीस भेट घेणार असल्याचं बोललं जात आहे. आज किंवा परवा ही भेट होणार असल्याची माहिती आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांशी संवाद साधत राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांबाबत नाराजी व्यक्त केली.  कोरोना कमी करण्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे छोटे व्यवसायी आणि जनमानसात तीव्र नाराजी आहे.  या सर्व घटकांशी चर्चा करुन निर्णय घेणे अपेक्षित होतं, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. हे निर्बंध विचार न करता लावण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी कडक निर्बंध लावले जातील असं म्हटलं होतं. मात्र सध्याची परिस्थिती पाहता सातही दिवस लॉकडाऊन सारखी परिस्थिती आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात मोठा असंतोष आहे. यातून मार्ग काढण्याचं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यामुळे ठाकरे सरकारचा रिमोट ज्यांच्याकडे आहे त्या शरद पवारांचीच भेट घेऊन यावर तोडगा काढण्याचा विचार देवेंद्र फडणवीसांचा आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

हे ही वाचा:

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ‘इथे’ फडकला तिरंगा

…अन्यथा उद्रेक होईल- देवेंद्र फडणवीस

नक्षलवाद्यांनी जवानाला बंदी बनवले

शरद पवारांनी घेतला लसीचा दुसरा डोस

केंद्र सरकारकडून आवश्यक लसींचा  पुरवठा होतो आहे. मात्र कधीकधी लसी कमी पडतात. आजच्या घडीला महाराष्ट्राला सर्वाधिक लसींचा पुरवठा होत आहे. भारत सरकारशी चर्चा करुन याबाबत मागणी केली पाहिजे. मीडियात येऊन याबाबत बोलणे योग्य नाही. यामध्ये राजकारण होता कामा नये, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
307,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा