26 C
Mumbai
Tuesday, December 10, 2024
घरराजकारणगांधी परिवाराच्या पाचव्या पिढीचे लॉंचिंग?

गांधी परिवाराच्या पाचव्या पिढीचे लॉंचिंग?

राहुल गांधी, भाचा रेहान वद्रा यांचा व्हीडिओ व्हायरल

Google News Follow

Related

गांधी परिवाराच्या पाचव्या पिढीचे लॉंचिंग झाल्याची चर्चा शुक्रवारी सर्वत्र सुरू होती. त्याला कारण होते काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी हे आपला भाचा रेहान वद्रा याच्यासह दीपावलीच्या शुभेच्छा देतांनाचा व्हीडिओ व्हायरल झाला. सोबतच राहुल गांधी आणि रेहान आपल्या घराच्या डागडुजीत हातभार लावत असल्याचेही व्हिडिओत दिसत होते. त्यावरून सोशल मीडियात चर्चा रंगली. हे गांधी परिवाराच्या पाचव्या पिढीचे लॉंचिंग असल्याचे मत लोक व्यक्त करत होते.

रेहानची आई आणि काँग्रेस नेता प्रियांका गांधी या आता पोटनिवडणुकीत उतरल्या आहेत. वायनाडमधून त्या निवडणूक लढवत आहेत. ही त्यांची पहिलीच निवडणूक आहे. या पार्श्वभूमीवर रेहान याला लॉन्च केले जात असल्याचे म्हटले जात आहे. रेहान हा व्हिज्युअल आर्टिस्ट आहे. तो वन्यजीवनाचे छायाचित्रण करतो तसेच व्यावसायिक फोटोग्राफरही आहे. नवी दिल्ली आणि मुंबईत त्याची प्रदर्शने भरली आहेत.

हे ही वाचा:

बलुचिस्तानमध्ये स्फोट; शाळकरी मुलांसह पाच जणांचा मृत्यू

‘अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर शरद पवार, उद्धव ठाकरे, राऊत आणि पटोले शांत’

१८ हिंदुंवर देशद्रोहाचा गुन्हा !

ट्रम्प यांच्याकडून अमेरिकेतील हिंदूंचे रक्षण करण्याचे आश्वासन

१० जनपथच्या बंगल्याची डागडुजी सुरू असताना त्यात राहुल गांधी आणि रेहान तेथील मजुरांना मदत करताना दिसले. राहुल गांधी रेहानला सांगताना दिसतात की उत्सवाच्या दिवसात लोक त्या उत्सवाशी निगडित कामगार, मजुरांना विसरतात. याआधी राहुल गांधी यांनी ट्रकचालक, मेकॅनिक यांच्याशी संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत. त्यावरून आता रेहानलाही या पद्धतीने राजकारणात आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जात आहे.

राहुल गांधी राजकारणात आले तेव्हा तेदेखील बुजरे होते. रेहानही बुजरा आहे, असे मत सोशल मीडियात व्यक्त होत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
211,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा