29 C
Mumbai
Saturday, October 1, 2022
घरराजकारणगुलाम नबी आझाद जम्मूमध्ये दाखल, नव्या पक्षाची घोषणा

गुलाम नबी आझाद जम्मूमध्ये दाखल, नव्या पक्षाची घोषणा

काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर आझाद प्रथमच त्यांच्या मूळ निवासस्थानी जम्मूमध्ये जाहीर सभेसाठी दाखल झाले आहेत.

Related

गुलाम नबी आझाद आपल्या नव्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करण्यासाठी जम्मूमध्ये पोहोचले आहेत. आज गुलाम नबी आझाद हे सैनिक फार्म, सैनिक कॉलनी येथे जाहीर सभा घेणार आहेत. या सभेमध्ये प्रादेशिक आणि राष्ट्रीय राजकीय पक्षांना एकत्र करून ताकदीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यावेळी आझाद राष्ट्रीय पातळीवरील नव्या राजकीय पक्षाची घोषणा करणार आहेत.

काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर आझाद प्रथमच त्यांच्या मूळ निवासस्थानी जम्मूमध्ये जाहीर सभेसाठी दाखल झाले आहेत. गेल्या वर्षी याच ठिकाणी काँग्रेसच्या जी-२३ गटाची जाहीर सभा झाली होती. गुलाम नबी आझाद आज सकाळी सतवारी विमानतळावर पोहोचले. तेथे जम्मू काश्मीरच्या विविध भागातील नेत्यांनी त्यांचे स्वागत केले.

सैनिक फार्म येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेत आझाद काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, आझाद यांना ऐकण्यासाठी लोक सकाळपासूनच कार्यक्रमस्थळी पोहोचत आहेत. विशेष म्हणजे, आझाद या सभेत नवीन राजकीय पक्षाची घोषणा करणार असल्याने या जाहीर सभेकडे इतर राजकीय पक्षांच्या नजरा खिळल्या आहेत. सैनिक फार्म येथे गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. माजी मंत्री, आमदार, डीडीसी, बीडीसी सदस्यांसह हजारो नेते आणि कार्यकर्ते जाहीर सभेला पोहोचणार आहेत.

हे ही वाचा:

भारतीय अर्थव्यवस्था येत्या सात वर्षात जगात तिसऱ्या क्रमांकावर

अखेर १८६६मध्ये बांधलेला कर्नाक पूल पाडण्यास सुरुवात

बॅनरवरून उद्धव गायब, एकनाथ शिंदेंचा बोलबाला

‘या’ गावात फक्त एकच गणपती

दरम्यान, २६ ऑगस्ट रोजी गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्याचवेळी त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये स्वत:चा राजकीय पक्ष काढणार असल्याचे जाहीर केले होते. गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर जम्मू-काश्मीर काँग्रेसमधील पाच आमदारांनी राजीनामा दिला होता. आझाद यांनी नवीन पक्ष स्थापन केला तर त्यांच्यासोबत जाणार, अशी भूमिका या पाच आमदारांची होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,969चाहतेआवड दर्शवा
1,945अनुयायीअनुकरण करा
41,700सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा