26 C
Mumbai
Tuesday, December 10, 2024
घरराजकारणमहाराष्ट्रात हरियाणाची पुनरावृत्ती होणार ही काळया दगडावरची रेघ

महाराष्ट्रात हरियाणाची पुनरावृत्ती होणार ही काळया दगडावरची रेघ

आमदार अतुल भातखळकर यांनी व्यक्त केला विश्वास

Google News Follow

Related

हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी स्पष्ट झाले. भाजपाने तिसऱ्यांदा हरियाणामध्ये यश प्राप्त केलं असून या निवडणुकीपूर्वीचे एक्झिट पोल अपयशी असल्याचे दिसून आले. बहुतेक एक्झिट पोल हरियाणात काँग्रेसचे सरकार स्थापन होईल असे दर्शवत होते. पोल ऑफ पोलमध्ये हरियाणात काँग्रेसला ५५ तर भाजपला २५ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता, यामुळे जवळपास सर्व एक्झिट पोल अयशस्वी झाल्याचे दिसून आले. यावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी आगामी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात हरियाणाची पुनरावृत्ती होणार, असा विश्वास दाखवला आहे.

अतुल भातखळकर म्हणाले आहेत की, “२०२४ लोकसभा निवडणुकी पाठोपाठ हरियाणाच्या निवडणूक निकालांनी, एक्झिट पोल हे जनमाणसाशी कोणतीही नाळ न जोडलेले, केवळ हवेतील मनोरे रचलेले असतात हे सिद्ध केले आहे. एक्झिट पोल काहीही म्हणोत, महाराष्ट्रात हरियाणाची पुनरावृत्ती होणार ही काळया दगडावरची रेघ आहे,” असा विश्वास आमदार अतुल भातखळकर यांनी व्यक्त केला आहे.

यापूर्वी, २०१९ मध्येही हरियाणा विधानसभा निवडणुकीत एक्झिट पोल अपयशी ठरल्याचे दिसून आले होते. भाजपाच्या स्पष्ट बहुमताच्या एक्झिट पोलच्या अंदाजाच्या विरुद्ध निकाल २०१९ साली लागल्याचे दिसून आले होते. सी व्होटरनेही भाजप ७२ जागा जिंकेल असा अंदाज वर्तवला होता, तो देखील चुकीचा ठरला होता. त्यानंतर यंदाच्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत एक्झिट पोलचे अंदाज चुकीचे ठरत असल्याचे दिसून आले आहे.

हे ही वाचा : 

काँग्रेस, पवार, ठाकरेंनी शस्त्रे परजली होती, पण आता सगळे चिडीचूप!

लालू प्रसाद यांच्या नातेवाईकाकडून २५ कोटींची मालमत्ता जप्त!

जम्मू- काश्मीरच्या अनंतनागमधून दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण

घटना घडून पाच दिवस झाल्यानंतर बोपदेव घाट परिसर पाहणीचा देखावा कशासाठी?

यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही अनेक एक्झिट पोलने भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार बहुमताने जिंकेल असा अंदाज वर्तवला होता. तर भाजपा स्वबळावर बहुमताच्या आकड्यापेक्षा जास्त जागा जिंकेल, असाही अंदाज एक्झिट पोलने वर्तवला होता. मात्र, एक्झिट पोलचे निकाल चुकीचे ठरले होते. लोकसभा निवडणुकीत एनडीएला २९३ तर भाजपला २४० जागा मिळाल्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
211,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा