27 C
Mumbai
Thursday, June 20, 2024
घरराजकारणमोदी जिंकले तर न्यायालयात जाऊ...जनआंदोलन उभारू... विरोधी पक्ष, आंदोलनजीवी, पाळीव पत्रकारांची योजना

मोदी जिंकले तर न्यायालयात जाऊ…जनआंदोलन उभारू… विरोधी पक्ष, आंदोलनजीवी, पाळीव पत्रकारांची योजना

अशा प्रकारच्या कारवायांत विरोधी पक्षनेते सहभागी आहेत. माजी अधिकारीही यात आहेत.

Google News Follow

Related

युट्युबर अजीत अंजूम यांच्या चॅनलवर स्वतःला पत्रकार म्हणवणाऱ्या नीलू थॉमस व्यास यांनी असे दावे केले आहेत, जे भयावह आहेत. स्वतः मॉब लिंचिंगविरोधी असल्याचे सांगत जमावाला शिव्याशाप देणारा हा समूह आता लोकशाहीऐवजी जमावतंत्रावर विश्वास दाखवतो आहे. अराजकतेला प्रोत्साहन देतो आहे.

मंगळवार, ४ जून २०२४ रोजी लोकसभा निवडणुकीचे मतदान होणार असून पतंप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करतील, याची पूर्ण शक्यता आहे. नीलू व्यास या व्हिडीओत सांगत आहेत की, विरोधी पक्षांचे जे काही मतमोजणी एजंट्स आहेत, त्या सर्वांना प्रशिक्षण दिले जात आहे, एग्झिट पोल्सशी कसे लढायचे, त्याची तयारी केली जात आहे. तसेच, मोठ्या जनआंदोलनाची तयारी केली जात आहे. जर मतांची चोरी पकडली गेली तर त्यासाठी न्यायालयातही जाण्याची तयारी केली जाईल व निवडणूक रद्दही केली जाईल. म्हणजेच विरोधी पक्ष लोकशाहीच्या या महापर्वला रद्द करण्याचा प्रयत्न करेल.

पोलिंग एजंटना काय प्रशिक्षण दिले जात आहे. अशी शक्यता आहे की, ज्या प्रकारे बिहारच्या छपरामध्ये मतदानादरम्यान माजी मुख्यमंत्री लालू यादव यांची मुलगी आणि राजदची उमेदवार रोहिणी आचार्य यांनी येथे पोहोचून हिंसाचाराला हवा दिली होती आणि दोन जण ठार झाले होते. तशाच प्रकारचे वातावरण मतमोजणी केंद्रांवर केले जाऊ शकते. पोलिंग एजंटना हिंसाचार भटकवण्याचे प्रशिक्षण दिले जाऊ शकते. तणाव कसा निर्माण करायचा, हे त्यांना शिकवले जात असेल. यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा:

सलमान खानवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानवरून आणली जाणार होती शस्त्रे

अल्पवयीन मुलीवर मौलावीकडून बलात्कार

इस्रायली कंपनीकडून लोकसभा निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न; भाजपाविरोधी अजेंडा चालवल्याचा आरोप

लोकशाहीच्या उत्सवाचा अंतिम टप्पा; ५७ जागांचे भवितव्य मतपेटीत होणार बंद

या निवडणुकीसाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जातील, असेही नीलू व्यास यांनी म्हटले आहे. तर, जनआंदोलनही उभारले जाऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे. शाहीन बागमध्ये मुस्लिमांना सीएएच्या विरोधात खोटे पसरवून मुस्लिमांना भडकवण्यात आले. शेतकरी आंदोलनाचाही वापर करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाला खलिस्तानी झेंडाही फडकवण्यात आला. अशा प्रकारचे आंदोलनही होऊ शकते.

अशा प्रकारच्या कारवायांत विरोधी पक्षनेते सहभागी आहेत. माजी अधिकारीही यात आहेत. स्वतःला बुद्धिजीवी म्हणणारेही यात आहेत आणि लोक त्यांच्यावर विश्वास ठेवत आहेत. त्यांचे आता कोणीही ऐकत नाही. ध्रुव राठी सारखे युट्युबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हुकूमशहा म्हणत आहेत. हे याच क्रमाचा भाग आहेत. लोककल्याणकारी योजना, पायाभूत कार्य आणि परदेशांमध्ये भारताच्या चांगल्या छबीला काळवंडण्याचा हा प्रकार आहे. विरोधी पक्ष सातत्याने यासाठी प्रयत्नशील आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
161,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा