25 C
Mumbai
Wednesday, March 29, 2023
घरराजकारणजितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांचा पुतळा जाळण्यास सांगितला

जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांचा पुतळा जाळण्यास सांगितला

नरेश म्हस्के यांचा गौप्यस्फोट

Google News Follow

Related

संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडल्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. श्रीकांत शिंदे हे आजारी असल्यामुळे ते बोलू शकत नाहीत. संजय राऊत यांना फक्त बदनाम करणे हेच ठाऊक आहे. जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांनी फोन करून आम्हाला अजित पवार यांचा पुतळा जाळायला सांगितला  होता. अजित पवार यांच्या पुतळ्याला ‘जोडे मारा’ असेही आम्हाला सांगण्यात आल्याचे म्हंटले आहे. खुद्द राष्ट्रवादीनेच अजित पवार यांच्या बदनामीचा कट रचला होता असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी केला आहे. आता म्हस्के यांनी केलेल्या आरोपांवर जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचेच लक्ष आहे.

राऊत आणि आव्हाड या गुंडांबद्दल बोलूच नये त्यांच्यासोबत तेच लोक आहेत जे एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध आहेत. राऊत फक्त  मातोश्रीला इंप्रेस करायचा प्रयन्त करतात. अशी बोचरी टीका पण म्हस्के यांनी केली आहे. आत्ता पुण्यात होणाऱ्या निवडणुकीत ठाकरे गटात भूकंप होणार आहे. ठाकरे गटातील उरलेले सर्वच नेते आणि काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेतेसुद्धा शिवसेनेतच प्रवेश करतील असा दावासुद्धा नरेश म्हस्के यांनी केला आहे.  संजय राऊत यांनी पोलीस आयुक्त आणि गृहमंत्र्यांना पत्र दिले आहे , आरोप केले आहेत आणि   त्यांनी चौकशीची मागणी केली आहे.  ठाणे पोलीस त्यांचा जबाब नोंदवून घेत आहेत. राऊत यांनी बिनबुडाचे आरोप करण्यावरून घुमजाव केले.

हे ही वाचा:

या २० देशांतील नागरिक करू शकतील भारतात UPI द्वारे व्यवहार.. जाणून घ्या तपशील

मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ.. हेरगिरी प्रकरणी खटला चालवण्यास मंजुरी

एकनाथ शिंदे शिवसेनेचे प्रमुख

आपला ठाकरे होणार नाही, याचे भान बाळगण्याची गरज!

कबड्डी स्पर्धेदरम्यान माझ्या अंगावर शाई फेकणार होते. काळे पण  फासणार होते असे आता राऊत जबाबात सांगत आहेत. राऊतांना हे सगळे आधीच कसे कळले हे त्यांनी आधी सांगावे जर का तुम्हाला धमकीचा फोन आला असेल तर तसे सांगावे.  राऊत यांनी जबाबात कोणताच पुरावा दिला नाही.  खासदार श्रीकांत शिंदे यांना फक्त बदनाम करण्याचे काम ते करत आहेत. शिवसैनिकांचा एकदा पारा चांगलाच चढला तर तेच राऊतांना चोपून काढतील. राऊत यांनी दोन हजार कोटीं रुपयांचा आरोप केला आहे. त्यावर निवडणूक आयोगचं निर्णय घेईल.

ठाकरेंसोबत जे घडले त्याला पैसे देण्याची गरजच नाही. ‘त्यांच्याकडे संजय राऊत नावाचे जे कार्ड आहे त्यामुळे लोक आपोआपच आमच्यकडे येतील’  शरद पवार यांनी संजय राऊत यांना शिवसेना संपवण्याची सुपारी दिली आहे. असा आरोपसुद्धा त्यांनी केला आहे.   पुढे म्हस्के यांनी सुषमा अंधारे यांच्यावर सुद्धा टीका करत बोलले कि, आपण एखाद्या व्यक्तीला वरिष्ठ  मानत असून तर त्यांना आपण पितृतुल्य मानतो ना अंधारे मॅडम, यांचे उद्धव ठाकरेंबाबत काय  मत आहे ते विचारा . याच अंधारे बाई बाळासाहेब यांना म्हाताऱ्या म्हणाल्या होत्या. हीच त्यांची संस्कृती आहे. उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना खांद्यावर घ्यावे असे सुद्धा त्या म्हणाल्या होत्या, असे म्हस्के पुढे म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,876चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
65,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा