उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झालेल्या पालघर साधू हत्याकांडात गुंतलेले असल्याचा आरोप ज्यांच्यावर केला जात आहे, त्या काशिनाथ चौधरी यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले असून आपला या घटनेशी काहीही संबंध नाही, फक्त आपण त्या घटनेचे साक्षीदार आहोत आणि त्या प्रकरणात सरकारने आपल्याला संरक्षण दिलेले आहे, असे चौधरी यांचे म्हणणे आहे.
काशिनाथ चौधरी यांना भारतीय जनता पार्टीने नुकचेत पक्षात स्थान दिल्यानंतर विरोधकांना आरोप करायला सुरुवात केली. पालघर साधू हत्याकांडातील आरोपीला भाजपाने कसा काय प्रवेश दिला असा सवाल विचारला गेला. यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी चौधरी यांच्या पक्षप्रवेशाला स्थगिती दिली. तरीही हे आरोप सुरूच आहेत. या पार्श्वभूमीवर काशिनाथ चौधरी यांनी आपली बाजू मांडली आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य असलेले चौधरी यांनी म्हटले की, पालघरमध्ये पाच वर्षांपूर्वी दोन साधुंची हत्या झाली होती. दोन दिवसांपूर्वी माझा भाजपा पक्षप्रवेश झाला. पण पाच वर्षापूर्वी साधू हत्याकांडाशी माझा संबंध जोडला गेला. या प्रकरणात मी साक्षीदार आहे आरोपी नाही. सरकारने मला सरकारने संरक्षण दिले आहे. या प्रकरणात माझी प्रतिमा मलिन झाली आहे. कालपासून माझं कुटुंब मानसिक तणावाखाली आहे. मी फक्त मदत करायला गेलो होतो. माझ्या मुलाला या सगळ्य आरोपांमुळे त्रास झाला आहे. या राजकारणासाठी माझी राजकीय कारकीर्द संपवायला काही लोक निघाले आहेत. या प्रकरणात पोलिसांच्या विनंतीवरुन मी वाचवायला गेलो होतो, असं ते म्हणाले. “दोन दिवसांपूर्वी माझा भाजपा पक्ष प्रवेश झाला होता. या पक्षप्रवेशानंतर पाच वर्षापूर्वी पालघर जिल्ह्यातील गडचिंचले साधू हत्याकांडाशी माझा संबंध जोडण्यात आला. या सर्व प्रकरणात मी फक्त साक्षीदार आहे. सरकारने मला संरक्षण सुद्धा दिले आहे.
हे ही वाचा:
आत्मघाती बॉम्बस्फोट ही एक ‘शहीद मोहीम’ …उमर नबीचा व्हीडिओ आला समोर!
ठाणे मनपा ऍथलेटिक्स योजनेच्या खेळाडूंची दमदार कामगिरी
गौतम गंभीरला सौरव गांगुलीचा सल्ला: “टेस्टमध्ये बुमराह-सिराजसोबत शमीलाही संधी द्या”
“या प्रकरणाशी माझा काहीही संबध नाही. त्याठिकाणी पोलिसांच्या सांगण्यावरून मी फक्त मदत करण्यासाठी गेलो होतो. या प्रकरणाशी माझा संबध जोडून वारंवार मला प्रसार माध्यमांमध्ये दाखवलं जात आहे. त्यामुळे माझी मुलगी, मुलगा खूप तणावात आहेत. राजकारणामुळे माझं कुटुंब भरडलं जात आहे” असं काशिनाथ चौधरी म्हणाले.
“जिल्ह्यातील भाजपाच्या स्थानिक पुढाऱ्यांसोबत चर्चा होऊन माझा भाजपा पक्ष प्रवेश झाला होता. यावेळी कोणतेही आश्वासन दिले नव्हते. मी एक फक्त कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. गडचिंचले प्रकरणात माझ्या सर्व चौकशा झाल्या आहेत. मी कुठेही आरोपी नाही तर या घटनेचा साक्षीदार आहे.







