काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कपिल सिब्बल यांना दिलेल्या मुलाखतीत न्यायाधीशांवरच शरसंधान केले आहे. न्यायाधीश कसे न्यायदान करताना विविध धार्मिक ग्रंथांचा उल्लेख करतात, त्याची गरज काय, असा सवाल खर्गे उपस्थित करत आहेत. गीतेतील विविध श्लोकांचा उल्लेख अनेकवेळा न्यायाधीश करत असतात, त्यावरच खर्गे यांचा आक्षेप असावा असे या मुलाखतीतून दिसत होते.
सिब्बल यांनी घेतलेल्या मुलाखतीत खर्गे म्हणतात की, न्यायाधीश न्यायदान करताना म्हणतात, हे अमूक एका ग्रंथात आले आहे, तमूक एका पुस्तकात लिहिले आहे. चातुर्वण्याचा उल्लेखही न्यायाधीशांकडून केला जातो. मला याचे आश्चर्य वाटते. आपण न्यायाचे रक्षण करणारे आहात, लोकांना मार्ग दाखवतो. सगळ्या धर्माचे लोक आपल्याकडे येतात. न्याय देणे हे आपले काम आहे.
आपल्याला त्या धर्मातील त्रुटी सांगायच्या आहेत हे लक्षात घेण्याऐवजी ज्या त्रुटी आहेत, त्यावरच न्यायाधीश शिक्कामोर्तब करतात. एकूणच हे लोक देशाला सुधारू इच्छित नाहीत, असेही खर्गे म्हणाले.
हे ही वाचा:
छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यामधून शस्त्रे, स्फोटकांचा मोठा साठा जप्त
“मुलाला माफ करणे हे वडिलांचे कर्तव्य” अभिषेकबाबत कल्याण बॅनर्जी नरमले
ममतांना आणखी एक धक्का; सुदीप बंदोपाध्याय बंडखोरांसोबत
ज्याच्यावर जग हसले, त्यानेच इतिहास लिहिला!
याच मुलाखतीत एका प्रश्नावर बोलताना खर्गे म्हणाले की, मला एकीकडे हिंदू मानता, पण मला देवळात येऊ दिले जात नाही, पाणी पिऊ दिले जात नाहीत, शिक्षण घेऊ दिले जात नाही. हे सगळे पाहून देशातील युवा पिढी काय म्हणत असेल?
त्य़ावर सिब्बल यांनी खर्गे यांच्याकडून आणखी खोलात जाऊन विचारणा केली की, आम्ही पण हिंदू आहोत, पण आम्हालाही हिंदू मानत नाहीत. त्यावर खर्गे म्हणाले की, निदान तुम्ही त्यांच्या जवळ तरी आहात, पण आम्ही तर दलित आहोत. तुम्ही देवळात तरी जाऊ शकता, आम्हाला तर देवळाच्या बाहेर उभे केले जाते.
सिब्बल यांनी त्यांना मनुस्मृतीची आठवण करून दिली. ते म्हणाले की, ते मनुस्मृतीच्या मार्गाने चालतात. तेव्हा खर्गे म्हणाले की, हो, मनुस्मृतीला जिवंत ठेवण्यासाठीच ते काम करतात. त्यावेळी त्यांनी न्यायाधीशांचा उपरोक्त उल्लेख केला.
खर्गे म्हणाले की, छोटे छोटे देश आपल्यापेक्षा पुढे गेले. जीडीपीमध्येही ते भारतापेक्षा पुढे आहेत. आपल्याकडे १४० करोड लोक आहेत त्यामुळे आपला जीडीपी मोठा आहे.







