29 C
Mumbai
Thursday, December 1, 2022
घरक्राईमनामा'पेडणेकरांची चौकशी करू नका म्हणून उद्धव ठाकरेंचा दबाव होता'

‘पेडणेकरांची चौकशी करू नका म्हणून उद्धव ठाकरेंचा दबाव होता’

कथित घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रे किरीट सोमय्यांनी माध्यमांसमोर सादर केली.

Google News Follow

Related

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची एसआरए घोटाळ्याप्रकरणी दादर पोलिसांनी चौकशी केली. किशोरी पेडणेकर यांच्यावर भाजपा नेते किरीट सौमय्या यांनी घोटाळ्याचे आरोप केले आहेत. आज, ३० ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या यांनी पेडणेकरांच्या चौकशीची मागणी केली आहे. तसेच ठाकरे सरकारच्या दबावामुळे याआधी पेडणेकरांची चौकशी झाली नाही, असा आरोपही सौमय्या यांनी केला आहे. यावेळी कथित घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रे त्यांनी माध्यमांसमोर सादर केली.

किरीट सोमय्या म्हणाले, मी वर्षभरापूर्वी पोलिसांना सगळे पुरावे दिले आहेत. एसआरएकडे सुद्धा पुरावे दिले होते. एफआयआर दाखल केला होता मात्र त्यावेळी उध्दव ठाकरेंच्या दबावामुळं पेडणेकरांविरुध्द कोणती चौकशी झाली नाही. त्यामुळे कालच मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना याबाबत भेटलो आहे. याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझी ही मागणी मान्य करतील, असा विश्वास सोमय्यांनी व्यक्त केला आहे.

शनिवार, २९ ऑक्टोबर रोजी किशोरी पेडणेकर हातात कुलूप घेऊन सदनिका बंद करण्यासाठी गेल्या होत्या. यावरून सोमय्यांनी त्यांना खोचक टोला लागलेला आहे. किशोरी पेडणेकरांना पुढच्या वर्षी या कामगिरीसाठी दादासाहेब फाळके पुरस्कार मिळू शकतो, असा टोला त्यांनी लगावला आहे.

पेडणेकर यांना कशाचीही भीती नसेल तर त्या पोलीस चौकशीला का घाबरत आहेत? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात सध्या सहा ठिकाणी चौकशी सुरू आहे. तसेच उच्च न्यायालयात मी जनहित याचिका केली होती त्यावरसुद्धा सुनावणी सुरु आहे. तर एसआरएनेदेखील या प्रकरणी चौकशीला सुरुवात केली आहे. करोना काळात कमाई घोटाळा, बेनामी संपत्ती असे वेगवेगळे आरोप पेडणेकर यांच्यावर आहेत, अशी माहिती सोमय्यांनी दिली. या सर्व घोटाळ्यांमुळे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने या सर्व प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणी किरीट सौमय्या यांनी केली आहे.

हे ही वाचा:

कंगना राणौत राजकारणात, भाजपामध्ये जाण्याची इच्छा

सेलिब्रेटीला पाहण बेतलं जीवावर, दक्षिण कोरियात चेंगराचेंगरी

गुजरात सरकार ‘ समान नागरी कायदा’ लागू करण्याच्या तयारीत

…. म्हणून मिलिंद नार्वेकरांची सुरक्षा वाढवली

याप्रकरणाचे पुरावे सादर करत सोमय्या म्हणाले, किशोरी पेडणेकर तसेच त्यांचे पुत्र साईनाथ पेडणेकर यांनी कागदपत्रांमध्ये खाडाखोड केली आहे. किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या मृत भावाच्या नावाने फसवणूक केली, असा गंभीर आरोपीही सोमय्यांनी पेडणेकरांवर केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,948चाहतेआवड दर्शवा
1,977अनुयायीअनुकरण करा
52,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा