29 C
Mumbai
Thursday, May 19, 2022
घरराजकारण‘प्रवीण कलमे कुठे आहेत हे जितेंद्र आव्हाड सांगणार आहेत का?’

‘प्रवीण कलमे कुठे आहेत हे जितेंद्र आव्हाड सांगणार आहेत का?’

Related

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. नंदकिशोर चतुर्वेदी यांचा आणि ठाकरे परिवाराचा कसा संबंध आहे. कंपनींच्या माध्यमातून कसे व्यवहार होतात, यावरून किरीट सोमय्या यांनी ठाकरे कुटुंबियांवर निशाणा साधला आहे. त्यानंतर त्यांनी प्रवीण कलमे यांच्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत काम करणारे प्रविण कलमे यांच्याबद्दल बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, त्यांनी माझ्याबद्दल अनेक तक्रारी केल्या, उच्च न्यायालयात अनेक आरोप केले. मात्र, हे प्रविण कलमे आज कुठे आहेत, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे.

एसआरएच्या सरकारी कार्यालयातून लपून कागद चोरताना त्यांना पकडण्यात आले होते. एसआरएच्या मुख्य अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्याविरोधात अजून का कारवाई होत नाही, ते कुठे गेले आहेत याचा शोध का घेण्यात येत नाही? असे सवालही त्यांनी उपस्थित केले आहेत. प्रवीण कलमे कुठे आहेत हे जितेंद्र आव्हाड सांगणार आहेत का? कलमे हे देश सोडून पळाले आहेत. पळून जायला कोणी मदत केली आहे का? असे सवालही किरीट सोमय्या यांनी केले आहेत.

हे ही वाचा:

‘हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदीला कुठे लपवले हे मुख्यमंत्री ठाकरेंनी सांगावे’

कर्करोगग्रस्त रुग्णांचा कुटुंबीयांसाठी ‘बाबू आर.एन. सिंह अतिथीगृह’

एसटी कर्मचारी आत्महत्या प्रकरणी सुओ मोटो खटला भरा!

देशभरातील १० हजार मंदिरांना मोहित कंबोज देणार लाऊडस्पीकर

किरीट सोमय्या यांनी यावेळी संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवरही प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत हे अनेक आरोप करत असतात. त्यांनी पुरावे दिले की उत्तर देऊ, असे किरीट सोमय्या म्हणाले. ‘माझ्याकडचे पुरावे मी पत्रकारांच्या समोर ठेवतो. उगाच हातात फडकावून दाखवत नाही,’ अशी खोचक टीका किरीट सोमय्या यांनी केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,973चाहतेआवड दर्शवा
1,889अनुयायीअनुकरण करा
9,340सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा