30 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरराजकारणराजकीय मिस मॅनेजमेंट मुळे महाराष्ट्र इटलीच्या मार्गावर

राजकीय मिस मॅनेजमेंट मुळे महाराष्ट्र इटलीच्या मार्गावर

Google News Follow

Related

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचे थैमान वाढायला लागले आहे. दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण बाधीत होत आहेत. कोविड काळातील प्रचंड भ्रष्टाचार देखील जनतेसमोर येत आहे. त्यामुळे राजकीय अव्यवस्थेमुळे महाराष्ट्र इटलीच्या वाटेवर जातो की काय अशी भिती आता वाटू लागली आहे.

जगभरात सर्वच ठिकाणी कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढते आहे. महाराष्ट्रातील परिस्थितीही चिंताजनक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे याबाबत नागरिकांना माहिती देत काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. जगातील सर्वात मोठ्या कोरोना हॉटस्पॉटमध्ये महाराष्ट्राचाही समावेश झालाय. या यादीत महाराष्ट्र चौथ्या स्थानी आहे. याशिवाय आशिया खंडात एकट्या महाराष्ट्रात कोरोनाचा इतका भीषण उद्रेक झालेला पाहायला मिळालाय.

हे ही वाचा:

ठाकरेंच्या ‘विदेशी’ आकडेवारीला फडणवीसांचे सडेतोड उत्तर

राहुल गांधी पाकिस्तानी ‘प्रॉपगॅन्डा’ चालवत आहेत का?

औरंगजेब झाला बद ‘सुरत’ (भाग ७)

युरोप आणि अमेरिकेला कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वात मोठा फटका बसला होता.  त्यांनाही मागे टाकत महाराष्ट्राची रुग्णवाढ झपाट्याने होत आहे. महाराष्ट्र सध्या युरोप, अमेरिकेपेक्षाही डेंजर झोनमध्ये गेलाय. आशिया खंडातल्या कोणत्याही देशापेक्षा सर्वाधिक रुग्ण सध्या एकट्या महाराष्ट्रात निघतायत. जगाच्या रुग्णवाढीशी तुलना केली, तर मागच्या २४ तासात महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. ही रुग्णवाढ अत्यंत भीतीदायक आहे.

१ एप्रिलला जगभरातील विविध देशांमध्ये किती कोरोना रुग्ण आढळले याची आकडेवारी पाहिली तर त्या २४ तासात ब्राझिलमध्ये ८९ हजार ४५९ रुग्ण आढळले तर अमेरिकेत ७६ हजार ७८९ नव्या रूग्णांची नोंद झाली होती. फ्रान्समध्ये ५० हजार ६५९ रुग्ण आढळले. या तिन्ही देशानंतर चौथ्या स्थानी महाराष्ट्राचा समावेश झालाय. १ तारखेला महाराष्ट्रात ४३ हजार १८३ रुग्णांची नोंद झाली. हा आकडा राज्यातला आजवरचा सर्वाधिक आणि जगातला चौथ्या क्रमांकाचा मोठा आकडा ठरला आहे.

एक एप्रिलच्या आकड्यांची तुलना केली तर, काल एकट्या महाराष्ट्रात ब्राझिल, अमेरिका आणि फ्रान्सनंतर सर्वाधिक रुग्णवाढ होती. कालपर्यंत कोरोनाच्या भीषणतेसाठी सारं जग इटली आणि ब्रिटचनं उदाहरण दिले जातं. भविष्यात ती वेळ महाराष्ट्रावर येते की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे.

राज्यातील कोरोनाची भीषणता लक्षात घेण्यासाठी देशांतर्गत परिस्थीती पाहिली तर अधिक स्पष्ट होईल. सध्या देशात ६ लाख १४ हजार ६६४ सक्रीय म्हणजेच कोरोनाचे उपचार घेत असलेले रुग्ण आहेत. ६ लाख १४ हजार ६६४ पैकी ३ लाख ६६ हजार ५३३ म्हणजे निम्म्यांहून जास्त रुग्ण फक्त महाराष्ट्रातील आहेत. दुसरी भयावह गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातल्या ३ लाख ६६ हजार ५३३ सक्रीय रुग्णांपैकी तब्बल अडीच लाख रुग्ण मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आणि नाशिक या पाच महानगरांमधले आहेत.

महाराष्ट्रातली फक्त एकएकटी शहरं जगातल्या अनेक देशांवर भारी पडताना दिसत आहेत. गेल्या २४ तासात पाकिस्तानात ४९७४ रुग्ण आढळले तर एकट्या मुंबईत ८६४६ रुग्ण सापडले. इंडोनेशियात ६१४२ रुग्ण सापडले तर पुणे जिल्ह्यात ८०२५ रुग्ण मिळाले. अनेक देशांपेक्षा महाराष्ट्रातील छोट्या शहरांतील रुग्णवाढ देखील वेगाने होताना दिसत आहे.

गेल्या वर्षी कोरोनाच्या रौद्ररुपासाठी इटली आणि ब्रिटनचं उदाहरण दिलं जातं होतं, आता जर महाराष्ट्र कोरोनाच्या फेऱ्यातून सुटला नाही, तर साऱ्या जगासाठी महाराष्ट्र हे नवीन उदाहरण होण्याची शक्यता आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा