28 C
Mumbai
Sunday, December 3, 2023
घरक्राईमनामा‘महुआ यांनी लॉग-इन, पासवर्ड शेअर केले, मोदींची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न’

‘महुआ यांनी लॉग-इन, पासवर्ड शेअर केले, मोदींची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न’

उद्योगपती हिरानंदानी यांचा प्रतिज्ञापत्रात दावा

Google News Follow

Related

संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा याआधीच वादात सापडल्या असताना हिरानंदानी उद्योग समूहाचे सीईओ दर्शन हिरानंदानी यांनी खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्याकडे महुआ यांच्या लोकसभेचा लॉग-इन आय़डी आणि पासवर्ड होता. त्यांनी स्वतःहूनच त्यात महुआ यांच्या वतीने प्रश्न टाकले होते, असा धक्कादायक खुलासा प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे. तसेच, ‘मोदींच्या स्वच्छ प्रतिमेने त्यांनी विरोधी पक्षांना त्यांच्यावर हल्ला करण्याची कोणतीही संधी दिली नव्हती. त्यामुळेच महुआ मोइत्रा यांनी मोदींना बदनाम करण्यासाठी अदानी यांना लक्ष्य करण्याचा मार्ग निवडला,’असेही या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.

अदानी यांना लक्ष्य करण्यासाठी मोइत्रा यांच्या संसदेच्या लॉग-इन आणि पासवर्डचा वापर केल्याची कबुली हिरानंदानी यांनी दिली आहे. जेव्हा दिग्गज कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (आयओसी) गुजरातस्थित धामरा एलएनजीची निवड आयात सुविधेसाठी केली होती, तेव्हा त्यांनी असे केले होते. महुआ त्यांच्याकडून महागड्या वस्तूंची मागणी करत असत, असा आरोपही त्यांनी केला आहे. त्यांनी दिल्लीतील महुआ यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणासाठीदेखील मदत केली होती. तसेच, सुट्टीदरम्यान ते जिथे प्रवासाला जात, त्याचा खर्चही हिरानंदानी करत असत. तसेच, देशपरदेशातील प्रवासादरम्यान लॉजिस्टिकल मदतही त्यांनी महुआ यांना पुरवली होती, असा दावाही त्यांनी केला आहे.

हिरानंदानी यांना आयओसीने त्यांची कंपनी एलएनजी टर्मिनलऐवजी धामरा या कंपनीची निवड केल्याचे समजले होते. या प्रश्नांच्या आधारे मोइत्रा यांनी काही प्रश्नांचा मसुदा तयार केला होता, जे प्रश्न ते संसदेत विचारू शकतील. त्यासाठी मोइत्रा यांनी संसदेच्या वेबसाइटवर खासदारांच्या वापरासाठी असलेला स्वतःचा आयडी आणि पासवर्डही दिला होता, म्हणजे हिरानंदानी अधिक माहिती पुरवू शकतील आणि त्याआधारे मोइत्रा संसदेला प्रश्न विचारू शकतील. ‘अदानी समूहाशी संबंधित हिरानंदानी यांनी विचारलेल्या प्रश्नांवरून चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्यामुळे मोइत्रा खूष झाल्या होत्या.

हे ही वाचा:

ड्रग्स माफिया ललित पाटीलच्या वाहनचालकाला अटक

बारामतीत विमान कोसळलं, पायलट जखमी!

‘वीर सावरकर, सिक्रेट फाईल्स’ या वेबसिरीजमधून सावरकरांचा जीवनपट उलगडणार

भारताचा विजयी चौकार, शतकांची ‘विराट’ झेप

अदानीसमूहावर केल्या जाणाऱ्या आरोपांबाबत समर्थन देण्याचीही विनंती मोइत्रा यांनी केली होती. त्यांनी मला त्यांचे संसद लॉग-इन आयडी आणि पासवर्ड दिले होते, म्हणजे आवश्यकता भासल्यास मी थेट त्यांच्या वतीने प्रश्न विचारू शकेन,’असा खळबळजनक दावा दर्शन हिरानंदानी यांनी प्रतिज्ञापत्रात केला आहे.

याआधी भाजपचे खासदार निशिकांत दुबे आणि मोइत्रा यांचे पूर्वीचे सहकारी वकील जय देहाद्राई यांनी मोइत्रा यांनी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी हिरानंदानी यांच्याकडून मदत घेतल्याचा आरोप केला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
110,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा