27 C
Mumbai
Sunday, September 15, 2024
घरक्राईमनामाअलिशान कार, कोट्यवधींची घड्याळे जप्त करत मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक

अलिशान कार, कोट्यवधींची घड्याळे जप्त करत मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक

१६ तास सुरू होती कारवाई

Google News Follow

Related

पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना सक्तवसुली संचनालयाने म्हणजेच ईडीने अटक केली आहे. मंगळवार, २० ऑगस्ट रोजी ईडीने मंगलदास बांदल यांच्या शिरूर आणि पुण्यातील निवासस्थानांवर छापेमारी केली होती. या कारवाईदरम्यान बांदल यांच्या निवासस्थानी कोट्यावधी रुपयांचे घबाड सापडले होते. याप्रकरणी ईडीने बांदल यांची चौकशी केली. या चौकशीनंतर ईडीने बांदल यांना अटक केली आहे. यामुळे पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या पुण्यातील महम्मदवाडी, शिक्रापूर आणि बुरुंजवाडी (ता. शिरूर) येथील निवासस्थानांवर मंगळवारी ईडीने अचानक छापे टाकले. या कारवाईत त्यांच्या घरात ५ कोटी ६० लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्याकडून पाच अलिशान कार, एक कोटींची चार घड्याळेही जप्त करण्यात आली आहेत. ईडीने तब्बल १६ तास ही कारवाई केली. यावेळी मंगलदास बांदल यांची कसून चौकशीही करण्यात आली. अखेर ईडीच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. बुधवार, २१ ऑगस्ट रोजी त्यांना मुंबईच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. शिक्रापूर येथील घरी मंगलदास बांदल यांच्या पत्नी रेखाताई बांदल, दोन भाऊ आणि त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी करण्यात आली. तर, महम्मदवाडी येथील बंगल्यात राहत असलेल्या मंगलदास बांदल यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मंगलदास बांदल यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, इंदापूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपा मेळाव्याला बांदल यांनी हजेरी लावल्याने त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली होती. शिवाय यानंतर येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मंगलदास बांदल किंवा त्यांच्या पत्नी रेखा बांदल या शिरूर-हवेलीमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी तयार असल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान, बांदल यांच्यावर ईडीची छापेमारी झाल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

हे ही वाचा :

उद्रेकानंतर बदलापूरमध्ये इंटरनेट सेवा बंद; जमावबंदी लागू

बदलापूर रेल्वे स्थानकावरील आंदोलकांवर अखेर पोलिसांचा लाठीमार !

टेक्सासमध्ये भगवान हनुमानाची ९० फूट उंची मूर्ती स्थापन !

बदलापुरातील हरामखोर नराधमाला फाशीच होणार…!

मंदलदास बांदल हे आत्तापर्यंत ईडीसमोर चारवेळा हजर झाले आहेत. त्यानंतर आता पहिल्यांदात हा छापा टाकण्यात आला आहे. मनी लॉन्ड्रींग प्रकरणात यापूर्वी बांदल यांना ईडीने वर्षभरापूर्वी नोटिसा बजावल्या होत्या. चौकशीसाठी ते चार वेळा ईडीच्या पुणे कार्यालयात हजरही राहिले होते. याशिवाय तीन वर्षांपूर्वी प्राप्तीकर विभागाकडून बांदल यांच्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला होता. या छाप्यामध्ये मोठी रक्कम आणि महागड्या गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत. बांदल हे शिवाजीराव भोसले सहकारी बँक फसवणूकप्रकरणी सध्या जामीनावर बाहेर आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा