29.3 C
Mumbai
Thursday, October 8, 2026
घरराजकारणआधीच्या सरकारांनी १० वर्षांत ५० हजार शौचालयेही बांधली नाहीत!

आधीच्या सरकारांनी १० वर्षांत ५० हजार शौचालयेही बांधली नाहीत!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला लगावला टोला, आम्ही १० वर्षांत ५० हजार अत्याधुनिक रेल्वे कोच तयार केले

Google News Follow

Related

गुजरातमधील वडोदरा येथे मंगळवारी आयोजित ‘नमो फॉर विकसित भारत’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला. भारताच्या विकासामुळे काही लोक कधीच खूश होऊ शकत नाहीत, असा टोला लगावत मोदी यांनी विरोधकांची तुलना ‘नाराज फुफा’शी केली. मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदरातून वडोदरापर्यंत दुमजली कंटेनर मालगाडी सुरू केल्याचा उल्लेखही केला.

काँग्रेसवर टीका करताना मोदी यांनी पुन्हा एकदा ‘नाराज फुफा’चा टोला लगावला. “काही लोक भारताच्या विकासाने कधीच खूश होऊ शकत नाहीत,” असे ते म्हणाले. पूर्वीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात विकासाचा वेग मंदावला होता, असा दावा करत मोदी म्हणाले की, त्यांच्या सरकारने विकासाला वेग दिला आहे. पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिका याचे उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.

आम्ही गेल्या १० वर्षांत रेल्वेचे ५० हजार आधुनिक डबे तयार केले पण याआधीच्या सरकारला १० वर्षात ५० हजार शौचालयदेखील बांधता आली नाहीत, अशा शब्दांत मोदींनी विरोधकांना टोला लगावला.

हे ही वाचा:

ऍमेझॉन, इन्स्टामार्टच्या गोदामांतून १.३८ कोटींचे मुदतबाह्य अन्न जप्त

पिकलबॉलमध्ये भारताची पदकांची लयलूट

सेन्सेक्स ५५५ अंकांनी कोसळला

काँग्रेसचा पचका; हल्दवानी ‘शुद्धीकरण’ प्रकरणाची याचिका काढली निकाली

या मालगाडीमुळे एका फेरीत २५० हून अधिक ट्रकइतका माल मुंबईहून वडोदरापर्यंत पोहोचवता येत असल्याचे त्यांनी सांगितले. याच मुद्द्यावरून मोदी यांनी विरोधकांवर मिश्कील शब्दांत टीका केली. “आता हे नाराज फुफाजी ओरडतील की या ट्रकवाल्यांचे काय होणार? पण आता देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत माल अधिक वेगाने पोहोचू शकतो,” असा टोला त्यांनी लगावला. रेल्वेचे जाळे आता देशाच्या अशा भागांपर्यंत पोहोचत आहे, जिथे पूर्वी रेल्वे पोहोचली नव्हती, असेही मोदी म्हणाले.

‘धुरंधर’च्या गाण्याने मोदींचे स्वागत

या कार्यक्रमात पंतप्रधानांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. आयोजकांच्या माहितीनुसार, ऑनलाइन तिकीट विक्री सुरू झाल्यानंतर अवघ्या एका तासात कार्यक्रमातील सर्व जागा आरक्षित झाल्या. कार्यक्रमात विविध संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ‘क्वीन’ या प्रसिद्ध बँडचे ‘वी विल रॉक यू’ हे गाणेही सादर करण्यात आले. पंतप्रधान मोदींचे आगमन झाल्यावर हे गाणे वाजू लागले. सर्वांना अभिवादन करत मोदी मंचाच्या दिशेने चालत होते. उपस्थितांमध्ये बसलेल्या अनेकांनी मोदींचे पोस्टर बनवले होते, तेही त्यांनी बघितले.

कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा प्रवास आणखी वेगवान करणे हा त्यांच्या गुजरात दौऱ्यामागचा उद्देश आहे. विकसित भारताचा प्रवास आणखी वेगवान करण्यासाठी मी तुमच्यामध्ये आलो आहे. काही वेळापूर्वीच देशाच्या विकासाशी संबंधित हजारो कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन झाले, असे मोदी म्हणाले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा