27 C
Mumbai
Wednesday, August 17, 2022
घरराजकारण"सडका कांदा बाजूला ठेवला तर बाकीचे कांदे वाचतील"

“सडका कांदा बाजूला ठेवला तर बाकीचे कांदे वाचतील”

Related

खासदार हेमंत गोडसेंचा संजय राऊतांना टोला

एखाद्या टोपलीत जो सडका कांदा असेल तो बाजूला काढून ठेवला तर बाकीचे कांदे वाचतील असं खासदारांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं. बोललं पाहिजे, बोलायला हरकत नाही. पण कधी महागाई पूर, लोकांचे हाल यावर बोलले का? संजय राऊत यांना कमी बोलायला लावा. कारण त्यामुळे जनता आणि आपलेच लोक नाराज होतात, असं उद्धव ठाकरेंना खासदारांनी सांगितलं होतं. काहींना परत येण्याची इच्छा होती. पण राऊतांच्या बोलण्यामुळे ते थांबले, ही वस्तुस्थिती आहे, असा गौप्यस्फोट नाशिक शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी केला.

नवी दिल्लीमध्ये शिवसेनेच्या १२ खासदरांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार हेमंत गोडसे हे देखील आज मुंबईत एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले. मुंबईतून नाशिकला जात असताना त्यांच्या सोबत हजारो कार्यकर्ते होते. हेमंत गोडसे यांनी घटना देवीचे दर्शन घेतले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. नाशिकमध्ये आल्यावर खासदार गोडसे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार गोडसे यांनी मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन केले.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रपती कोविंद यांना फेअरवेल डिनर

बजरंग दलाने कॉंग्रेसच्या पक्ष कार्यालयावर लिहिले हज हाऊस

चीनमध्ये बँकिंग संकट; नागरिकांना रोखण्यासाठी बँकांसमोर रणगाडे तैनात

पंतप्रधान मोदींनी घेतली द्रौपदी मुर्मू यांची भेट

संघर्ष सत्तेसाठी नाही तर विकासासाठी

यावेळी बोलताना हेमंत गोडसे यांनी संजय राऊतांवर प्रहार केला. गोडसे म्हणाले की, आता जो संघर्ष आहे तो सत्तेसाठी नसून विकासासाठी आहे. २००७ साली जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकीय सुरुवात केली. त्यावेळी बांधकाम व्यवसाय बाजूला ठेवून लोकांना न्याय देण्यासाठी काम केलं. २०१४ मध्ये खासदारकीची संधी दिली. त्यावेळी १ लाख ८७ हजारांच्या मताधिक्याने निवडून आलो. यानंतर आपण नाशिकमध्ये केलेल्या विकासकामांचा पाढाही त्यांनी वाचून दाखवला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,914चाहतेआवड दर्शवा
1,919अनुयायीअनुकरण करा
23,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा