28 C
Mumbai
Friday, August 6, 2021
घरराजकारणराजकीय स्वार्थासाठी ठाकरे सरकार करतंय महाराष्ट्राची बदनामी

राजकीय स्वार्थासाठी ठाकरे सरकार करतंय महाराष्ट्राची बदनामी

Related

महाराष्ट्रातील ठाकरे सरकार हे राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्राचे बदनामी करत असल्याचा घणाघात भाजपा नेते आशिष शेलार यांनी केला आहे जलयुक्त शिवार योजनेवर होणाऱ्या आरोपांना उत्तर देताना शेलार यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. जलयुक्त शिवारच्या कामांमध्ये अनियमितता बघणे हा ठाकरे सरकारने सुरू केलेला बदनामीचा दुसरा खेळ आहे. दुर्दैवाने या बदनामीच्या खेळामध्ये बदनामी आपल्या राज्याची होत आहे असे आशिष शेलार म्हणाले.

जलयुक्त शिवारची कामे जिल्हाधिकारी स्तरावर ठरली. त्याला लघु पाटबंधारे खातं, जलसंधारण, वन खाते अशा विविध सात खात्याची परवानगी मिळाली. देयके देण्याचा अधिकार हा संपूर्णपणे जिल्हाधिकाऱ्यांचा होता. मंत्रालयात या योजनेचे फक्त धोरण ठरले होते. त्यामुळे या योजनेसाठी कोणा एका व्यक्तीला बदनाम करण्याचा प्रयत्न या माविआ सरकारने करू नये त्यात ते सफल होऊच शकत नाहीत असे आशिष शेलार म्हणाले.

हे ही वाचा:

जिन्ना हाऊस म्हणजे फाळणीचे दुःखद स्मृतिस्थळ

‘आमचे उद्धव काका’ या विषयावर आता निबंध!

राज्याचे प्रश्न कोमात, स्वबळाची छमछम जोमात

२०३२ चे ऑलिम्पिक ‘या’ शहरात होणार…

जलयुक्त शिवारमुळे मराठवाड्यातील पाण्याची पातळी वाढली. फडणवीस सरकारच्या काळात चार वर्ष दुष्काळ होता तरीही पिकांची उत्पादकता वाढली. या योजनेसाठी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या, श्रमदान केले, आपला निधीसुद्धा दिला. याचे कारणही ही योजना फलदायी होती त्यामुळे या योजनेवर होणारी टीका ही शेतकरीविरोधी आहे असे अशिष शेलार म्हणाले.

जे या योजनेतील देयकांबद्दल प्रश्न उपस्थित करतात त्यांनी साधी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, ३ लाखांच्या वरच्या कामांचे टेंडर काढले जाते. त्याच्या खालची जर कामे असतील तर ती जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवरच केली जातात. हे कळत नसेल तर आश्चर्यच आहे. सीएसआरच्या फंडातून जी कामं झाली ती एनजीओने स्वतः काढली आणि केली. केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी जे राज्याचा हिताचे होते त्याला बदनाम करण्याचे काम ठाकरे सरकारने करू नये. ते पुन्हा तुमच्यावरच उलटेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,319अनुयायीअनुकरण करा
2,170सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा