31 C
Mumbai
Sunday, June 4, 2023
घरराजकारण'महाविकास आघाडीला शरीया कायदा लागू करायचा आहे'

‘महाविकास आघाडीला शरीया कायदा लागू करायचा आहे’

भाजपा नेते नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Google News Follow

Related

भाजपा नेते नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंबई तोडण्याचा डाव गुजरातमधून शिजतोय असं विधान संजय राऊत यांनी केलं होतं. त्यावर आता तुम्हाला शाह आडनावाची अ‍ॅलर्जी वाटतेय. तर, गुजराती बंधूंचा पैसा कसा चालतो तुम्हाला? तुमचा मालक बाहेरगावी जातो तिकडचा खर्च कोणाचा असतो? एक पैसाही उद्धव ठाकरेंच्या खिशातला जात नाही. यांचा सगळा खर्च हे उद्योगपती करत असतात. ते कसं चालतं? असे सवाल उठवत सडकून टीका केली आहे.

संविधान धोक्यात असतं तर तुमच्या सारख्याने रोज सकाळी ९ वाजता येऊन आमची सकाळ खराब केली असती का? संविधान पाळत असते तर आमच्या हिंदूंवर अत्याचार झाला नसता. रझा अकॅडमीचे लाड हे लोक करत बसले नसते. तुम्ही संविधानला मानत नाही आहात हे आम्हाला माहिती आहे. पंतप्रधानांनी टीका करणाऱ्यांची जी यादी सांगितली ते सामान्य लोक नव्हते तर ते काँग्रेसचे लोक होते, असं नितेश राणे म्हणाले.

काल रात्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हुतात्मा स्मारकावर गेले होते. त्यामुळे गोमूत्राने हुतात्मा स्मारकाचे शुद्धीकरण केले पाहिजे, असंही नितेश राणे म्हणाले. यांना इथे शरीया कायदा लागू करायचा आहे. उद्धव ठाकरे आणि या सर्वांचे धर्मांतर झाले आहे. २०१९ ला यांना खुर्ची देताना त्यांचे धर्मांतर करून टाकलं आहे. संजय राऊत हे महाभारतातील शकुनीमामा आहेत. उद्या उद्धव ठाकरेंच्या घरात भांडणे झाली तर त्याला जबाबदार संजय राऊतच असणार आहेत हे उद्धव ठाकरेंना सांगून ठेवतो, अशी घणाघाती टीका नितेश राणेंनी केली.

हे ही वाचा:

कुस्तीगीरांचे आंदोलन म्हणजे हुडा आणि बजरंग पुनिया यांचा कट

महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून हुतात्म्यांना अभिवादन!

उत्तर प्रदेशच्या राम सिंह यांनी केला चक्क रेडिओंचा संग्रह!

नेपाळवरून येऊन ‘ते’ करतात रत्नागिरीतील हापूस आंब्याची राखण !

तसेच येत्या एक दोन दिवसात मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटून ‘केरळ स्टोरी’ला करमुक्त करावं अशी विनंती करणार असल्याचं ते म्हणाले. केरला स्टोरी सारखाच काही दिवसात ‘दिशा सालियन फाईल्स’ हा चित्रपटही ओटीटीवर येणार आहे, अशी माहिती नेते नितेश राणे यांनी दिली. त्यांच्या या विधानानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,850चाहतेआवड दर्शवा
2,021अनुयायीअनुकरण करा
76,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा