28 C
Mumbai
Saturday, December 2, 2023
घरराजकारणउबाठा सेनेत उद्धव ठाकरेंसकट सर्व सोंगाडे

उबाठा सेनेत उद्धव ठाकरेंसकट सर्व सोंगाडे

संजय राऊत यांच्या जन्मतारखेबाबत संभ्रम असल्याचा नितेश राणेंचा दावा

Google News Follow

Related

भाजपा आमदार नितेश राणे आणि त्घाकारे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी खासदार संजय राऊत यांच्या जन्मतारखेबाबत संभ्रम असल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. खासदार संजय राऊत यांचा १५ नोव्हेंबरला वाढदिवस आहे. एकीकडे संजय राऊतांवर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना नितेश राणे यांनी मात्र ही तारीख चुकीची असल्याचा दावा केला आहे.

“उबाठा सेनेमध्ये उद्धव ठाकरेंसकट सर्व सोंगाडे आणि ४२० भरले आहेत. एक चिपळूणचा सोंगाड्या आणि दुसरा भांडुपचा देवानंद. काही लोक जन्मजात सोंगाडे असतात. संजय राऊत यांनी जरा हे सांगावे की , २००४ ते २०१६ पर्यंत राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तुमच्या ऍफिडेव्हिटमध्ये तुमचा वाढदिवस हा १५ एप्रिल १९६१ रोजी आहे. २०१६ ते २०२८ पर्यंत तुम्ही जे ऍफिडेव्हिट भरलं त्याच्यामध्ये तुमचा वाढदिवस १५ नोव्हेंबर १९६१ ला आहे,” अशी माहिती देत नितेश राणेंनी संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींविषयी केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळे केजरीवाल, प्रियांका गांधींना नोटीस

५.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्याने पाकिस्तान हादरले

सुब्रत रॉय यांनी दोन हजार रुपयांत गोरखपूरमधून व्यवसायाची सुरुवात

टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरात एका महिलेवर बलात्कार!

संजय राऊत यांनी नेमकी त्यांची जन्म तारीख का बदलली? असा सवाल नितेश राणे यांनी राऊतांना विचारला आहे. त्यांनी पुढे म्हटलं की, “जन्म तारीख का बदलली? याच्यामध्ये कुठली ४२० शी आहे, याचे स्पष्टीकरण राज्यातील जनतेला मिळाले पाहिजे. नेमकं तुम्हाला शुभेच्छा १५ एप्रिलला द्यायच्या की १५ नोव्हेंबरला द्यायच्या याबाबद्दल आज तरी राज्यातील जनतेच्या ज्ञानात भर टाका,” अशी खोचक टीका नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
110,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा