29 C
Mumbai
Thursday, December 1, 2022
घरराजकारण“वैभव नाईक पैसे जमवणार तर चौकशी होणारच”

“वैभव नाईक पैसे जमवणार तर चौकशी होणारच”

भाजपा आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे, भास्कर जाधव आणि वैभव नाईक यांच्यावर सणसणीत टीका केली आहे.

Google News Follow

Related

राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरू असताना भाजपा आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे, भास्कर जाधव आणि वैभव नाईक यांच्यावर सणसणीत टीका केली आहे. आमदार वैभव नाईक यांची एसीबीकडून चौकशी सुरू आहे त्यानंतर वैभव नाईक यांच्या समर्थकांकडून मोर्चा काढण्यात आला आहे. यावरून नितेश राणे यांनी टीकास्त्र सोडले आहे.

एसीबीकडे पुरावा असल्याशिवाय चौकशी केली जाणार नाही. वैभव नाईक पैसे जमवणार तर त्यांची चौकशी होणारच, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे. मालमत्ता व्यवस्थित असेल तर घाबरण्याची काय गरज आहे. त्यांनी पुरावे सादर करावेत आणि क्लीनचीट मिळवावी, असं नितेश राणे म्हणाले.

माणूस कसा बदलला हे यंत्रणांना माहित असतं. त्यांच्याकडे पुरावे असतात. माहिती असते उगाच ते तपास करत नाहीत, अशी टीका त्यांनी केली. चौकशी आमचीही झाली आम्ही मोर्चे नाही काढले, चौकशीसाठी सामोरे गेलो, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.

वैभव नाईकांचे २००९ ते २०१९ पर्यंत पैसे आणि मालमत्ता कशी वाढली. मालमत्तेची माहिती त्यांनी दिली पाहिजे असं म्हणत नितेश राणेंनी काही कागदपत्र वाचून दाखवली. २००९ साली वैभव नाईक यांची कणकवली, कोल्हापूरमध्ये जमीन होत्या त्याची किंमत ५० लाख ते १ कोटी रुपये इतकी होती. तर २०१४ साली जमिनींची संख्या वाढली आणि मालमात्तेची किंमत ७ कोटी रुपये इतकी झाली. पत्नीच्या नावेही मालमत्ता आहे. त्यानंतर २०१९ मध्ये २२ ते २५ कोटींची मालमत्ता त्यांची नोंदवली आहे. गोवा, पुणे येथे मोठे हॉटेल्स त्यांनी सुरू केले आहेत. बेनामी मालमत्ता १४० ते १५० कोटी आहे. तर ही मालमत्ता यंत्रणांना दिसणार नाही का? असा सणसणीत सवाल त्यांनी विचारला आहे.

हे ही वाचा:

पूजा चव्हाणसाठी मी लढत असताना भास्करशेठ तुम्ही कुठल्या बिळात लपला होतात?

रॉजर बिन्नी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष

येरवडा कारागृहातील कैदी जगात हुशार

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, ६ मृत्यू

त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. नेते भाजपा, बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या नेत्यांवर, नारायण राणेंवर टीका करणार आणि ठाकरे मातोश्रीमध्ये बसून मजा करणार, अशी घाणाघाती टीका त्यांनी केली आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना बघूनच निवडणूक आयोगाने त्यांना चिन्ह म्हणून आईस्क्रीम कोन दिला आहे, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे. यावेळी त्यांनी भास्कर जाधव यांच्यावरही जोरदार निशाणा साधला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,948चाहतेआवड दर्शवा
1,977अनुयायीअनुकरण करा
52,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा