32 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरदेश दुनियाअजित पवार यांची वैचारिक उंची कळली

अजित पवार यांची वैचारिक उंची कळली

नितेश राणेंचे ट्विट करत प्रत्युत्तर

Google News Follow

Related

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर केलेल्या टिप्पणीवर आता ” देवाने मला दिलेल्या शरीरयष्टीवरून भाष्य करून अजित पवार यांची वैचारिक उंची कळली”असं राणेंनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. नितेश राणे यांनी याबाबत ट्वीट करुन अजित पवार यांच्या केलेल्या टिप्पणीला उत्तर दिलं आहे.

नितेश राणे यांनी काय म्हटलं?

लघूशंकेनी धरणाची उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला देवाने दिलेल्या शरीरयष्टीवरुन भाष्य केले यावरुनच त्यांची वैचारिक उंची कळली,आता हे सिद्ध झाले की यांना ‘औरंग्यावरची’ टीका सहन होत नाही म्हणूनच यांचे काका छत्रपती शिवाजी महारांजाच्या समाधीपुढे कधीही नतमस्तक झाले नाही,असं नितेश राणे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

अजित पवार काय म्हणाले होते?
छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हेत, तर स्वराज्यरक्षकच आहेत असं वक्तव्य अजित पवार यांनी विधानसभेत केल्यानंतर वाद निर्माण झाला होता. यावर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन पडदा टाकला. एकीकडे आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत म्हणत असतानाच दुसरीकडे शरद पवारांच्या भूमिकेशीही सहमत असल्याचे सांगितलं. अजित पवार यांना कालच्या पत्रकार परिषदेत भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. “नितेश राणे म्हणाले शरद पवारसाहेब कधीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख करत नाहीत आणि ते आजपर्यंत कधीही रायगडावर गेलेले नाहीत” असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर अजित पवार म्हणाले की, “टिल्ल्या लोकांनी असं काही सांगायचं कारण नाही. त्यांची उंची किती, त्यांची झेप किती, त्यांना मी कशाला उत्तर देऊ. माझे बाकीचे प्रवक्ते उत्तर देतील. असल्यांच्या नादी मी लागत नसतो ”

हे ही वाचा:

जितेंद्र आव्हाड आपली सर्वस्वी श्रद्धा औरंगजेबावर आहे!

सोमालियामध्ये दोन कारमध्ये स्फोट, ९ ठार

सिंधुताई सपकाळ अनाथांची माय

रितेशच्या चित्रपटाने प्रेक्षकांना लावले “वेड”

नितेश राणे म्हणतात,धरणवीरांना धर्मवीर कसे समजणार?
नितेश राणे यांनी ट्वीट करत अजित पवार यांना डिवचलं होतं. ‘धरणवीर’ना ‘धर्मवीर’ कसे समजणार .आता धर्म रक्षणासाठी तलवार नको ‘शाही पेन’ ही चालेल,”असे ट्वीट करत राणे यांनी नाव न घेता अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा