29.6 C
Mumbai
Tuesday, May 12, 2026
घरराजकारणपश्चिम बंगालला स्वतंत्र राष्ट्र घोषित करा...बांगलादेशचा नेता नुरुल हुडाचे फुत्कार

पश्चिम बंगालला स्वतंत्र राष्ट्र घोषित करा…बांगलादेशचा नेता नुरुल हुडाचे फुत्कार

...तर बांगलादेशातील लोक ममतांच्या पाठीशी

Google News Follow

Related

बांगलादेशातील जमात ए इस्लामीचा नेता मोहम्मद नुरूल हुडा यांनी पश्चिम बंगालमधील निकालांमुळे संतापून ममता बॅनर्जींनाच आवाहन केले आहे की, त्यांनी हे निवडणूक निकाल स्वीकारू नये आणि पश्चिम बंगालला स्वतंत्र राष्ट्र घोषित करावे. ममता बॅनर्जी यांच्या समर्थनार्थ केलेल्या नव्या वक्तव्यांमुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे.  एका व्हीडिओमधून बांगला भाषेत हुडा हे आवाहन करत आहेत.

आपल्या वक्तव्यात हुडा यांनी भाजपला “मतचोर”, “सांप्रदायिक” आणि “दंगलखोर” पक्ष असे संबोधले, तसेच ममता बॅनर्जी यांनी सत्ता न सोडण्याच्या भूमिकेला उघड पाठिंबा दिला. हुडा यांनी पुढे जाऊन ममता बॅनर्जी यांना “दिल्लीचे शासन नाकारावे” आणि पश्चिम बंगालला स्वतंत्र राष्ट्र घोषित करावे, असे आवाहन केले. त्यांच्या मते, बंगालने दिल्लीकडून येणारे “परके” आणि “गैर-बंगाली” नियंत्रण स्वीकारू नये. त्यांनी असेही म्हटले की, असा निर्णय घेतल्यास संपूर्ण बांगलादेशातील लोक पश्चिम बंगालच्या समर्थनार्थ उभे राहतील.

बांगलादेश जमात नेत्याने असा दावाही केला की, बांगलादेशातील १७ कोटी मुस्लिम ममता बॅनर्जी यांनी बंगालच्या स्वातंत्र्याची घोषणा केल्यास त्यांना पाठिंबा देतील. त्यांनी सांगितले की, संपूर्ण बांगलादेश या निर्णयाच्या बाजूने उभा राहील. नुरुल हुडा असेही आवाहन करतात की, भारतातील इतर राज्यांनीही दिल्लीच्या राजवटीतून स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न करावा.

हे ही वाचा:

माझ्या मुलाच्या हत्येत तृणमूलचा हात…

सुवेंदू अधिकारी यांच्या पीएच्या हत्येत बनावट नंबर प्लेटच्या गाडीचा वापर

गोव्यात बागा-कलंगुट किनाऱ्यावर १७ अतिक्रमणे जमीनदोस्त

“भारताची प्रतिक्रिया दहशतवाद विरोधात ठाम आणि अचूक!”

आपल्या वक्तव्यात हुडा यांनी ममता बॅनर्जी यांनी भाजपकडे सत्ता न सोपवण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. त्यांनी त्यांचे “धाडसी पाऊल” म्हणून कौतुक केले आणि राजीनामा देण्याऐवजी “दिल्लीविरुद्ध युद्ध घोषित करा” असेही आवाहन केले.

जमात ए इस्लामी हिंदचे उपाध्यक्ष मोहम्मद सलीम इंजीनियर यांनीही ममता बॅनर्जी यांच्या राजीनामा न देण्याच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “ही त्यांची राजकीय भूमिका आहे आणि त्यातून असा संदेश दिला जातो की, हा जनादेश खरा जनादेश नाही आणि निवडणूक आयोगामार्फत जनतेने दिलेला निर्णय नाही. कदाचित हाच संदेश त्या द्यायचा प्रयत्न करत आहेत. आम्हालाही असे वाटते की निकाल खऱ्या अर्थाने जनमताचे प्रतिनिधित्व करत नाहीत आणि मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून निकालांमध्ये फेरफार करण्यात आला. पण कोणी राजीनामा दिला किंवा नाही दिला म्हणून प्रक्रिया थांबणार नाही. सरकार स्थापन होईल आणि त्यासाठी सर्व तरतुदी उपलब्ध आहेत.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
306,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा