29 C
Mumbai
Sunday, July 25, 2021
घरराजकारणनिलंबनप्रकरणी न्यायालयात जाऊन संघर्ष करू

निलंबनप्रकरणी न्यायालयात जाऊन संघर्ष करू

Related

भाजपा आमदारांनी घेतली पत्रकार परिषद

विधानसभेच्या दोन दिवसांच्या अधिवेशनात पहिल्या दिवशी निलंबित करण्यात आलेल्या भाजपाच्या १२ आमदारांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी झालेल्या गोंधळानंतर भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले होते. या निलंबित आमदारांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन हे निलंबन म्हणजे षडयंत्र आहे आणि याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले. भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर, आ. आशीष शेलार, आ. पराग अळवणी, आ. गिरीश महाजन यावेळी उपस्थित होते. आमदार अतुल भातखळकर यांनी यावेळी सांगितले की, हे भाजपाच्या आमदारांविरुद्ध केलेले षडयंत्र आहे. आम्ही याप्रकरणी न्यायालयात दाद मागणार आहोत आणि त्यासाठी अखेरपर्यंत संघर्ष करू.

या निलंबनप्रकरणी भारतीय जनता पार्टीने तीव्र नाराजी व्यक्त करत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला होता. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत आशीष शेलार यांनी म्हटले की, या सगळ्या प्रकरणी आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि कायदेतज्ज्ञांसह आम्ही चर्चा केली आहे. आम्ही हे सत्य न्यायालयात मांडणार आहोत. आम्हाला योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.

हे ही वाचा:

१५ जुलैपासून ग्रामीण भागात शाळा सुरु?

कृपा भैया… पावन झाले

टाळेबंदीमध्ये वाढली अनधिकृत बांधकामे

महाराष्ट्रातील हे नेते मोदी मंत्रिमंडळात निश्चित?

दोन दिवसांच्या अधिवेशनात आपण पाहिले की, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी १२ विधानसभा सदस्यांच्या निलंबनाची जी कारवाई केली ती सूडबुद्धीने, षडयंत्र रचून महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने केली आहे. पडद्याआडच्या गोष्टी भयंकर आहेत. त्याची आज आम्ही वाच्यता करणार नाही. त्यांचा योग्यवेळी स्फोट जरूर करू. ज्यावेळी १२ नावे ठरवली जात होती, त्यावेळी त्याची कारणे काय होती. विशिष्ट नावे का घेतली गेली, कुणीही शिवीगाळ केलेली नसताना ही कहाणी का रचण्यात आली, विशिष्ट १२ क्रमांक का घेतला या मागे राजकीय षडयंत्र आहे. म्हणून त्यादिवशी आम्ही स्पष्ट केले की, कुठलाही गुन्हा न करताही आम्ही शिक्षा सहन करणारे १२ सदस्य आहोत. नैसर्गिक न्यायाला धरून आमचे म्हणणे मांडण्याची संधी आम्हाला द्यायला हवी होती. ती संधी दिली नाही. ज्या गोष्टीचा पुरावाच नाही. कारण घटना घडलीच नाही. त्यामुळे पुराव्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे कपोलकल्पित घटनेवरून एवढी कारवाई करण्यात आली त्याचा आम्ही निषेध करतो आहोत.

शेलार पुढे म्हणाले की, ४७ वर्षे जे प्रतिबंधित होते अशा दारुच्या परवान्याला परवानगी देऊ शकता तर १०० वर्षांपेक्षा जास्त परंपरा असलेल्या गणेशोत्सवावर बंदी का घालताय? नाहीतर हिंदू सणांवर निर्बंध घातल्याबद्दल ठाकरे सरकारला जनतेच्या क्षोभाला सामोरे जावे लागेल. त्याची जबाबदारी ठाकरे सरकारची असेल.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर, योगेश सागर, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, पराग अळवणी, राम सातपूते, हरीश पिंपळे, संजय कुटे, जय कुमार रावल, नारायण कुटे, बंटी भांगडीया या आमदारांना निलंबित करण्यात आले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,287अनुयायीअनुकरण करा
2,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा