सर्वसाधारण पणे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर हिंदीत चित्रपट काढण्याची कधीही परंपरा राहिलेली नाही. ते शिवधनुष्य कुणीही पेलले नव्हते पण छावा या चित्रपटाने महाराष्ट्र ढवळून काढला आहे. विशेषतः या चित्रपटातील संभाजी महाराजांच्या क्रूरकर्मा औरंगजेबाने केलेल्या निर्घृण हत्येच्या प्रसंगाने प्रत्येक रसिक हेलावल्याचे चित्र सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येते आहे.
विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करण्याचे आव्हान उत्तमरित्या पेलले असल्याची भावना आता जनमानसात व्यक्त होते आहे. त्या चित्रपटातील विविध प्रसंगांबद्दलची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. त्यातील संभाजी महाराजांच्या आणि कवी कलश यांच्या औरंगजेबाने केलेल्या माणसाला लाजवेल अशा हत्येच्या प्रसंगाने रसिकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. औरंगजेब कसा खुनशी आणि क्रूर होता याचे चित्रण हा प्रसंग करतो, अशा प्रतिक्रिया लोक व्यक्त करत आहेत.
हे ही वाचा:
दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा ताज कोणाच्या नशिबी?
कुंभ का कोई मतलब नहीं है, यह फालतू है!
वर्षा रघुवंशी हुंडा मृत्यू प्रकरणात फईम कुरेशीला १० वर्षांची शिक्षा
बलात्कार प्रकरणी मोहम्मद निशाल या युट्यूबरला अटक
चित्रपटगृहातील किंवा चित्रपटगृहातून बाहेर येणाऱ्या रसिकांच्या डोळ्यातून अश्रुच्या धारा वाहात असल्याचे अनेक व्हीडिओ समोर येत आहेत. एक मुलगी तर हा अखेरच्या प्रसंग पाहून ढसाढसा थिएटरमध्येच रडत असल्याचे दिसत आहे. तर काही लोकांनी डोळे पुसत संभाजी महाराजांच्या असीम शौर्याला सलाम केला आहे.
छावा हा चित्रपट लक्ष्मण उतेकर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झाला आहे. टपालसारखा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला होता. त्यामुळे छावा या चित्रपटात ते काय कमाल करून दाखवणार याकडे लक्ष होते. मात्र चित्रपट पाहून आता रसिकांनी या चित्रपटातील हा प्रसंग बघवत नाही, औरंगजेब किती क्रूर होता हे हा चित्रपट दाखवतो असे मत रसिक व्यक्त करतात. संभाजी महाराजांनी औरंगजेबाला जी रोखठोक उत्तरे दिली त्याबद्दलही लोक राजांच्या शौर्यापुढे नतमस्तक होत आहेत.







