केरळमध्ये सोशल मीडियावर मित्र असलेल्या महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी एका २५ वर्षीय युट्यूबरला अटक करण्यात आली आहे. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे येथील कलामासेरी पोलिसांनी मोहम्मद निशाल याला शनिवारी कोझिकोड येथून अटक केली, असे पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
तक्रारीनुसार, युट्यूबरने महिलेचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी देऊन दोनदा बलात्कार केला होता. तो व्हिडिओ आणि फोटो तिच्या पतीलाही पाठवण्याची धमकी दिली, असे पोलिसांनी तक्रारीचा हवाला देत सांगितले.
हेही वाचा..
कुंभ का कोई मतलब नहीं है, यह फालतू है!
नवी दिल्ली : प्लॅटफॉर्मवर अचानक गर्दी वाढल्यामुळे चेंगराचेंगरी, १८ जणांचा मृत्यू!
नरेंद्र मोदींचा ‘राजीव गांधी’ करण्यासाठी आखला जात होता कट
४० देशांतील युवा नेत्यांचा राज्यपालांशी संवाद
आरोपींविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात असेच गुन्हे असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. युट्युबरला येथील स्थानिक न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली, असे निवेदनात म्हटले आहे.