30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरराजकारणपंतप्रधान जिल्हाधिकाऱ्यांना देणार कानमंत्र

पंतप्रधान जिल्हाधिकाऱ्यांना देणार कानमंत्र

Google News Follow

Related

देशातील वाढता कोरोना प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रासह दहा राज्यातील ५४ जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. येत्या २० मे रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी संवाद साधतील. यावेळी ते महाराष्ट्रासह १० राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या गुरुवारी २० मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. यावेळी महाराष्ट्रासह कोरोनामुळे प्रभावित १० राज्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. यात ते वाढता कोरोना आटोक्यात आणण्यासाठी काय प्रयत्न करावेत, कोरोना लसीकरण कसे वाढवू शकतो, याशिवाय विविध विषयांवर संवाद साधतील.

पंतप्रधान मोदी २० मे रोजी सकाळी ११ वाजता ही बैठक घेतील. यावेळी ५४ जिल्हाधिकारी उपस्थित राहतील. दरम्यान या बैठकीला महाराष्ट्रासह इतर कोणकोणत्या दहा राज्यातील जिल्हाधिकारी सहभागी होतील, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

हे ही वाचा:

मुंबई महानगरपालिकेकडून लसींसाठी ग्लोबल टेंडर

उपमुख्यमंत्र्यांची ‘सोशल’ उधळपट्टी

मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला झापले

शिवसेना मंत्र्याला न्यायालयाची चपराक

दरम्यान देशातील कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासात साडेतीन लाखांहून अधिक नवीन रुग्ण सापडले आहेत. आदल्या दिवशीच्या तुलनेत रुग्णसंख्येत जवळपास १४ हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात ३ लाख ६२ हजार ७२७ नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर तब्बल ४ हजार १२० कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. गेले सलग दोन दिवस नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा