25 C
Mumbai
Sunday, September 13, 2026
घरराजकारणनशामुक्त युवा, ड्रग्जमुक्त भारत हाच आपला संकल्प!

नशामुक्त युवा, ड्रग्जमुक्त भारत हाच आपला संकल्प!

नरेंद्र मोदींंनी 'मन की बात'मधून केले आवाहन

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’च्या १३७व्या भागातून देशवासीयांना संबोधित केले. यावेळी त्यांनी नशामुक्त भारत अभियानावर विशेष भर दिला. नशामुक्त युवा, ड्रग्जमुक्त भारत, हा आपला संकल्प आहे. विशेषतः आपले तरुण मोठ्या संख्येने या अभियानाचा भाग होत आहेत. शेवटी, भारतातील तरुणांचे आरोग्य, त्यांचा आनंद आणि उज्ज्वल भविष्यासाठीच हा आपला सामूहिक संकल्प आहे.”

पंतप्रधानांनी सांगितले की, नशेचे व्यसन केवळ एका व्यक्तीलाच आपल्या विळख्यात घेत नाही, तर त्याचे दुष्परिणाम संपूर्ण कुटुंबाला आणि समाजालाही भोगावे लागतात. ड्रग्जविरोधात लोकांमध्ये जनजागृती करणाऱ्या आणि नशेच्या व्यसनाशी झुंज देणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी पुढे येणाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले.

पंतप्रधान मोदी यांनी देशातील युवक, कलाकार आणि कंटेंट क्रिएटर्सना या अभियानात सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “नशामुक्त भारतासाठी तुम्ही एखादा प्रभावी घोषवाक्य तयार करू शकता का? आपल्या युवा संगीतकारांनी ड्रग्जमुक्त जीवनाचा संदेश देणारी गाणी तयार करू शकतील का? विद्यार्थी आणि नाट्यगट अशी हृदयस्पर्शी लघुनाटके लिहू शकतील का, ज्यामध्ये ड्रग्जचे धोके सांगण्याबरोबरच त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही दाखवला जाईल?”

हे ही वाचा:

नेपाळ महापुराने घेतले ७३४ बळी, ३०० भारतीय बेपत्ता

तरुणांच्या प्रश्नांवर भाजपचा फोकस; नितीन नबीन यांची ‘टीम-४५’सोबत चर्चा

नेपाळ-तिबेट सीमेवरील महाप्रलयाचे व्हिडीओ जिनपिंग सरकारने केले गायब

समृद्धीवर १८ लाखांचा दरोडा; वकिलाला लुटले

पंतप्रधान म्हणाले की, देशात उत्कृष्ट कंटेंट क्रिएटर्सची कमतरता नाही. त्यांनी विविध भाषांमध्ये असे आशयपूर्ण कंटेंट तयार करावेत, ज्यामुळे समाजाला या दिशेने मदत होईल. लोकांनी आपले प्रयत्न सोशल मीडियावर हॅशटॅगसह शेअर करण्याचेही त्यांनी आवाहन केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “अनेकदा सर्जनशील प्रयत्न औपचारिक अभियानांपेक्षा अधिक प्रभावी ठरतात.” लोकांना आवाहन करताना ते म्हणाले, “चला, भारतातील युवकांना नशेपासून दूर ठेवण्यासाठी आणि नशामुक्त ठेवण्यासाठी या पवित्र कार्यात आपण सर्वजण आपली भूमिका बजावूया. आपले प्रयत्न #नशामुक्तयुवा या हॅशटॅगसह सोशल मीडियावर जरूर शेअर करा.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
333,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा