26 C
Mumbai
Tuesday, June 21, 2022
घरराजकारणदेहूत पंतप्रधान मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी

देहूत पंतप्रधान मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात कवी-संत तुकाराम महाराजांचे निवासस्थान देहूला भेट देणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी वारकरी समुदायाला देखील संबोधित करणार आहेत.

काही महिन्यांपूर्वी वारकरी समाजाच्या शिष्टमंडळाने नवी दिल्लीत जाऊन मोदींना देहू भेटीचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी देहूला भेट देण्याचे निमंत्रण स्वीकरले आहे. निमंत्रणानुसार १४ जून २०२२ रोजी पंतप्रधान देहूला जाणार आहेत, असे महाराष्ट्र-भाजपा आध्यात्मिक समन्वय समितीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींनी निमंत्रण स्वीकारल्यामुळे देहूमध्ये त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु झाली आहे.

पंतप्रधान मोदी देहूतील संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २० जूनला देहूतून पंढरपूरकडे जाणार आहे. त्यापूर्वी १४ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूत येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज संस्थान आणि देहू नगरपंचायतीच्यावतीने जोरदार तयारी सुरु आहे. तसेच पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयामार्फत सुरक्षेसंदर्भात आढावा घेण्यासाठी देहूमध्ये पोलिस अधिकाऱ्यांच्या फेऱ्या वाढल्या आहेत. संत तुकाराम महाराज संस्थानच्यावतीने देऊळवाड्यातील विविध कामे पूर्ण करण्यात येत आहेत. ५ जूनपर्यत देऊळवाड्यातील कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.

हे ही वाचा:

‘ह्या’ राज्यात आहे देशातील सर्वात जास्त सोन्याचा साठा

पंतप्रधान मोदी साधणार अनाथ मुलांशी संवाद

‘रोहित पवारांनी असले धंदे बंद करावेत’

पंतप्रधान मोदींनी सांगितली ही योग दिनाची थीम

दरम्यान, या देऊळवाड्यातील संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. या मंदिराचे पूर्ण काम पाषाणामध्ये असून, मंदिरावर नक्षीकाम केले आहे. शिळा मंदिरावर दोन सुवर्ण कळस, इतर ३४ छोटे कळस आहेत. शिळा मंदिरातील संत तुकाराम महाराजांची मूर्ती ४२ इंच उंचीची आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,940चाहतेआवड दर्शवा
1,920अनुयायीअनुकरण करा
10,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा